बाप्पाच्या स्वागतासाठी श्रुती मराठे सज्ज; कमरेला ढोल बांधून करतेय प्रॅक्टीस, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 02:33 PM2023-08-09T14:33:11+5:302023-08-09T16:19:13+5:30

ढोल पथकांमध्ये नेहमीच दिसणारा एक अतिशय गोड चेहरा म्हणजे अभिनेत्री श्रुती मराठे

Actress Shruti marathe shared dhol tasha pathak practice video | बाप्पाच्या स्वागतासाठी श्रुती मराठे सज्ज; कमरेला ढोल बांधून करतेय प्रॅक्टीस, व्हिडीओ व्हायरल

बाप्पाच्या स्वागतासाठी श्रुती मराठे सज्ज; कमरेला ढोल बांधून करतेय प्रॅक्टीस, व्हिडीओ व्हायरल

googlenewsNext

 महाराष्ट्राचं लाडकं दैवत म्हणजेच गणपती बाप्पांचं आगमन आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. बाप्पांचं स्वागत दणदणीत व्हावं, यासाठी महाराष्ट्रातील लहान- मोठ्या सगळ्याच शहरातील ढोल पथकं मागील महिना भरापासून कसून सराव करत आहेत.ढोल पथकांतील प्रत्येक सदस्याकडे असा काही उत्साह असतो की तो नकळतपणे ढोलवादन बघणाऱ्याच्याही अंगात शिरतो आणि मग ढोल- ताशांच्या तालावर बघणाराही आपोआप थिरकू लागतो.

या ढोल पथकांचा उत्साह आणखी वाढविण्याचे काम करतात काही मराठी कलावंत. अनेक मराठी कलावंतांना ढोल पथकांत सहभागी व्हायला आवडते. त्यांचा या पथकांतील उत्साहपूर्ण वावर, त्या- त्या पथकांची शोभा निश्चितच वाढविणारा असतो.

ढोल पथकांमध्ये नेहमीच दिसणारा एक अतिशय गोड चेहरा म्हणजे अभिनेत्री श्रुती मराठे. श्रुतीने नुकताच तिचा ढोल वादनाची प्रॅक्टिस करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.  श्रुती उत्तम वादक असून ती दरवर्षी बाप्पाच्या मिरवणुकीत सहभागी होऊन ढोल-ताशा वाजवते. 

पुण्यातील एनएमव्ही हायस्कुल येथे खास कलाकारांसाठी असलेल्या 'कलावंत' या ढोलताशा पथकाची प्रॅक्टिस केली जाते. त्यात  श्रुती स्वतः कमरेला ढोल बांधून सराव करताना दिसतेय. या पथकात  अनेक श्रुतीसह कलाकार ढोल वाजवण्यासाठी दरवर्षी सहभागी होतात. त्यात सौरभ गोखले, तेजस्विनी पंडित यांचाही समावेश आहे. श्रुतीने  पथकासोबत सरावा करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात ती खूप आनंदाने आणि ताकदीने ती सराव करताना दिसतेय. तिथे उपस्थित सगळेच प्रचंड उत्साही आहेत .श्रुतीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Web Title: Actress Shruti marathe shared dhol tasha pathak practice video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.