Confirm या तारखेला ही मराठमोळी अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात, असा असणार सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 04:42 PM2019-11-30T16:42:29+5:302019-11-30T16:48:37+5:30

लग्नानंतरही काम करत राहणार का यावर मात्र तिने कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण दिलेले नाही.

Actress Neha Pendse Wedding Date Confirm, Read Wedding Details | Confirm या तारखेला ही मराठमोळी अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात, असा असणार सोहळा

Confirm या तारखेला ही मराठमोळी अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात, असा असणार सोहळा

googlenewsNext

आली लग्न घटिका समीप, करा हो लगीनघाई म्हणत अभिनेत्री  नेहा पेंडसेच्याही लग्नासाठी काऊंटडाऊन  सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या लग्नाच्या तयारीत बिझी झाली आहे. काही दिवसांपूर्वीच नेहाने तिचा बॉयफ्रेंड शार्दुल सिंग बयाससह फोटो शेअर करत प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. शार्दुलचा ग्लॅमर इंडस्ट्रीशी संबंध नसून तो एक व्यावसायिक आहे. नेहाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शार्दूलसोबतचे काही फोटो पाहायला मिळतात. तसेच प्रेमाची जाहीर कबुली दिल्यानंतर सारेच नेहाचे लग्न कधी होणार याकडेच सा-यांचे लक्ष लागले होते. अखेर तो क्षण आला आणि नवीन वर्षाच्या सुरूवातीला म्हणजेच 5 जानेवारी 2020 मध्ये ती शार्दुलसह आपल्या आयुष्याची नवी सुरूवात करणार आहे. नेहाचे लग्न पुण्यात होणार असून काही मित्र मैत्रिणी आणि कुटुंबिय या सोहळ्याला उपस्थित असतील.

 

आपल्या जीवनातील हा सुंदर आणि खास सोहळा आयुष्यभर लक्षात राहावा यासाठी नेहा कोणतीही कसर सोडणार नाही.त्यामुळे योग्य वेळ आल्यावर लग्नाचे सगळी अपडेट ती स्वतः चाहत्यांसह शेअर करणार असल्याचे तिने दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.  


नेहा पेंडसे बऱ्याच काळापासून रुपेरी पडद्यापासून दूर आहे. मध्यंतरीच्या काळात ती रियालिटी शो बिग बॉसमध्ये बिझी होती. त्यामुळे आता नेहाच्या फॅन्सना तिने लवकरात लवकर रुपेरी पडद्यावर यावे अशी इच्छा आहे. नेहा सोशल मीडियावरही तितकीच एक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधते. तसंच आपले फोटो आणि व्हिडीओसुद्धा ती फॅन्ससह शेअर करते. मात्र आता लग्नानंतरही काम करत राहणार का यावर मात्र तिने कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण दिलेले नाही. 
 

Web Title: Actress Neha Pendse Wedding Date Confirm, Read Wedding Details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.