महाराष्ट्र सदनात रंगणार अभिनेत्री मधुरा वेलणकर 'मधुरव - बोरू ते ब्लॉग' खास प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 03:46 PM2023-07-31T15:46:59+5:302023-07-31T15:53:23+5:30

मराठी भाषेचा जन्म कसा झाला,मराठी भाषेचा रंजक इतिहास आणि त्यातली वेगवेगळी स्थित्यंतरे मधुरा वेलणकर आणि तिचे सहकलाकार नाट्य, नृत्य, संगीत या मनोरंजनाच्या माध्यमातून या कार्यक्रमातून सादर करतात.

Actress madhura velankar will perform madhurav boru te blog at maharashtra sadan | महाराष्ट्र सदनात रंगणार अभिनेत्री मधुरा वेलणकर 'मधुरव - बोरू ते ब्लॉग' खास प्रयोग

महाराष्ट्र सदनात रंगणार अभिनेत्री मधुरा वेलणकर 'मधुरव - बोरू ते ब्लॉग' खास प्रयोग

googlenewsNext

"राजभवन", "गेट वे ऑफ इंडिया" अशा ऐतिहासिक वास्तूमध्ये सादर केला गेलेला एकमेव मराठी नाट्य प्रयोग "मधुरव बोरु ते ब्लॉग" आता थेट दिल्ली येथे सादर होणार असून त्याचे निमित्त ही ख़ास आहे . "मधुरव बोरु ते ब्लॉग"  चा २५ वा (रौप्य महोत्सवी) प्रयोग दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे येत्या ३ ऑगस्टला सायंकाळी ६:३० वाजता होणार असून दिल्ली मराठी प्रतिष्ठान यांच्यातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 

मराठी भाषेच्या जन्माची संगीतमय कहाणी! मराठी भाषेचा जन्म कसा झाला,मराठी भाषेचा रंजक इतिहास आणि त्यातली वेगवेगळी स्थित्यंतरे मधुरा वेलणकर आणि तिचे सहकलाकार नाट्य, नृत्य, संगीत या मनोरंजनाच्या माध्यमातून या कार्यक्रमातून सादर करतात.

ज्या मराठीतून आणि ज्या मराठीसाठी आपण भांडलो,लढलो,एकत्र आलो त्या "मराठी" भाषेवरचा हा एकमेव नाट्यप्रयोग!मराठी भाषेतला किंवा मराठी नाट्य क्षेत्रातला हा एक अभिनव प्रयोग इतक्या मर्यादित दृष्टीने या कार्यक्रमाकडे न पाहता, मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा मिळावा यासाठी मराठीची माहिती, मराठीची महती कळावी आणि मराठी वरचं प्रेम, मराठीचं कौतुक आणि मराठीचा अभिमान लोकांमध्ये जागृत व्हावा यासाठी उचललेले एक पाऊल आहे आणि ते यशस्वी होत आहे हे गेल्या २४ प्रयोगांच्या अनुभवांवरून दिसून येत आहे. अनेक जणांनी मराठी वाचायला,लिहायला,बोलायला सुरूवात केली आहे हा या कार्यक्रमाचा सकारात्मक परिणाम.

भाषेविषयीच्या अनेक माहीत नसलेल्या गोष्टी कलेच्या माध्यमातून या कार्यक्रमांमध्ये उलगडत जातात त्यामुळे  हा कार्यक्रम महत्वपूर्ण ठरतो म्हणून  प्रेक्षकांनी जाणकारांनी  प्रसार माध्यमांनी ह्या कार्यक्रमाचे कौतुक केलं आणि ह्या पुढेही कृतिशील पाठिंबा आणि प्रोत्साहन देत रहायला हवं. हा गौरव आपल्या मराठीचा आपल्या मातृभाषेचा आपल्या सगळ्यांच्या अस्तित्वाचा आहे.

या कार्यक्रमाचे उत्तरोत्तर भरपूर प्रयोग व्हावे,  जिथे जिथे मराठी माणूस आहे त्यांच्या मनामध्ये मराठी विषयी प्रेम निर्माण व्हावं यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचून  हा कार्यक्रम करण्याची इच्छा मधुरा वेलणकर साटम, अभिजीत साटम तसंच या  कार्यक्रमाची लेखिका डॉक्टर समीरा गुजर आणि या कार्यक्रमातले कलाकार जुई भागवत, आकांक्षा गाडे, आशिष गाडे, श्रीनाथ म्हात्रे यांनी व्यक्त केली.

Web Title: Actress madhura velankar will perform madhurav boru te blog at maharashtra sadan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.