मोबाईलच्या दुकानात काम करणारा झाला अभिनेता !!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2018 09:33 IST2018-05-05T03:40:47+5:302018-05-05T09:33:14+5:30

गेल्या २-३ वर्षांपासून मराठी चित्रपटसृष्टीतील सुरु  झालेला ग्रामीण प्रेमकथांचा ट्रेंड हा आजही  चांगलाच  सुरू आहे. यामध्ये आता भर पडणार ...

Actor working in a mobile shop !! | मोबाईलच्या दुकानात काम करणारा झाला अभिनेता !!

मोबाईलच्या दुकानात काम करणारा झाला अभिनेता !!

ल्या २-३ वर्षांपासून मराठी चित्रपटसृष्टीतील सुरु  झालेला ग्रामीण प्रेमकथांचा ट्रेंड हा आजही  चांगलाच  सुरू आहे. यामध्ये आता भर पडणार आहे. गुरुकृपा प्रॉडक्शन एंटरटेनमेंटच्या अमोल बाबुराव लवटे निर्मित ज्ञानेश्वर यादवराव उमक दिग्दर्शित वंटास या चित्रपटाची. 'वंटास' संपूर्ण महाराष्ट्रात नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

ग्रामीण भागातील ही प्रेमकथा असल्याने यामध्ये एका व्यक्तिरेखेसाठी  हवा तसा कलाकार सापडत नव्हता. अखेर  हा शोध जाऊन संपला तो  थेट दर्यापूर येथील एका मोबाईलच्या दुकानात काम करणाऱ्या तरुणाशी. दर्यापूरचा अक्षय माहुलकर या युवकाचे नशीब चांगलेच फळफळले असून त्याला थेट एका नवीन आशयाच्या सिनेमात अभिनय करण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. या सिनेमात "बुंग्या" नावाची एक महत्वपूर्ण भूमिका अक्षयने साकारली असून  या सिनेमात अक्षय हिना पांचाळ या अभिनेत्रीसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.

अक्षय हा दर्यापूर मधील एका मोबाईल शॉपी मध्ये काम करतो. "वंटास" सिनेमाचे दिग्दर्शक ज्ञानेश्वर उमक हे अक्षयचे चांगले मित्र आहेत. ज्ञानेश्वर उमक यांच्या डोक्यात त्यांना हव्या असलेल्या पात्रासाठी अक्षय हा योग्य व्यक्ती असल्याचे जाणवले.  आपल्या एका मित्राकडून अक्षयला सिनेमाचं चित्रीकरण सुरू असलेल्या ठिकाणी बोलवले. अक्षयची परिस्थिती एवढी बिकट होती की त्याच्याकडे अकलूजला येणासाठी पैसेही नव्हते.या चित्रपटातील "टिपूर टिपूर..." ह्या गाण्याला  सोशल मीडियावर चांगलाच प्रतिसाद मिळत आहे 

सुदर्शन महामुनी यांनी चित्रपटाची कथा आणि संवाद लेखन केलं आहे. हरीश राऊत आणि ज्ञानेश्वर उमक यांनी पटकथा लिहिली आहे. वलय आणि सुदर्शन महामुनी यांनी लिहिलेल्या गीतांना पंकज पडघम यांनी संगीतबद्ध केलं आहे. शैलेश जाधव यांनी कॅमेरामन म्हणून काम पाहिले असून संकलन जागेश्वर ढोबळे यांचे आहे तर कार्यकारी निर्माता म्हणून शैलेंद्र पवार यांनी काम पाहिले आहे.

Web Title: Actor working in a mobile shop !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.