म्हणून अभिनेता संजय मोने यांनी साकारली कुख्यात डॉन हाफिज सईदची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2017 10:28 IST2017-03-20T04:58:56+5:302017-03-20T10:28:56+5:30
कुख्यात अंडरवल्ड डॉन छोटा राजनवर आधारित आहे. मराठी चित्रपटात यापूर्वी कधीच न झालेला असा थरार 'राजन' या चित्रपटामार्फत सिनेरसिकांना ...

म्हणून अभिनेता संजय मोने यांनी साकारली कुख्यात डॉन हाफिज सईदची भूमिका
क ख्यात अंडरवल्ड डॉन छोटा राजनवर आधारित आहे. मराठी चित्रपटात यापूर्वी कधीच न झालेला असा थरार 'राजन' या चित्रपटामार्फत सिनेरसिकांना अनुभवायला मिळणार आहे.संतोष जुवेकर छोटा राजनच्या भूमिकेत झळकणार आहे.आता त्या पाठोपाठ आणखी एक मराठी अभिनेता वाँटेड दहशतवादी हाफिज सईदची भूमिका रूपेरी पडद्यावर साकारण्यासाठी सज्ज झाला आहे. होय, वाँटेड दहशतवादी हाफिज सईदच्या भूमिकेत संजय मोने झळकण्यासाठी सज्ज झाले आहेत.आगामी 'शूर आम्ही सरदार' या सिनेमातून संजय मोनेची ही आगळी वेगळी भूमिका रसिकांना अनुभवता येणार आहे.खास या भूमिकेसाठी संजय मोने यांनी खूप मेहनत घेतली असून अशा प्रकारची भूमिका त्यांनी पहिल्यांदाच केली आहे. संजय मोने यांना देण्यात आलेला हाफिज सईजचा गेटअपमुळे आपण खरोखरच या डॉनला पाहतोय याचा भास होत राहतो.शिवाय सिनेमात गणेश लोके, शंतनू मोघे, सयाजी शिंदे, भारत गणेशपुरे असे अनुभवी कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.प्रकाश जाधव यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहेत. दहशवादाविरोधात एकत्र आलेले हे तीन तरूण काय करतात, त्यांना दहशवादाविरोधात काम करण्यात यश येतं का या आशयसूत्रावर हा सिनेमा आधारित आहे. आपल्या आगळ्या वेगळ्या भूमिकेविषयी 'आजवर मी अशा प्रकारची भूमिका केलेली नाही. मी हाफिद सईदसारखा दिसू शकतो आणि ही भूमिका साकारू करू शकतो हे कळणं हे दिग्दर्शकाचं मोठेपण आहे. ही भूमिका नक्कीच आव्हानात्मक होती. तशी प्रत्येकच भूमिका आव्हानात्मक असते,' असं मोने म्हणाले.
भूमिका समजून घेण्यासाठी,हाफिज सईद समजून घेण्यासाठी थोडी तयारी करावी लागली असंही त्यांनी सांगितलं. 'लुकटेस्टवेळी मेकअप केल्यावर मला लक्षात आलं, की मी बऱ्यापैकी हाफिज सईदसारखा दिसतो. त्यामुळे काम सोपं झालं. युट्यूबवरून हाफिज सईदचे काही व्हिडिओज पाहिले आणि त्याला समजूून घेण्याचा प्रयत्न केला. सिनेमात माझी भूमिका छोटी; मात्र लक्षवेधी आहे,' असंही मोने यांनी सांगितलं.२१ एप्रिलला हा सिनेमा रूपेरी पडद्यावर झळकणार आहे.