या घराचं संवर्धन इतकं अवघड आहे का? दादा कोंडकेंच्या घराची दयनीय अवस्था पाहून प्रथमेश परब ‘सुन्न’!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2021 03:43 PM2021-07-04T15:43:49+5:302021-07-04T15:45:18+5:30

नुकतीच प्रथमेशने दादांच्या जुन्या घराला भेट दिली आणि त्या घराची अवस्था बघून तो सुन्न झाला. पोस्ट शेअर करत त्याने याकडे लक्ष वेधले.

actor prathamesh parab visits dada kondakes old home | या घराचं संवर्धन इतकं अवघड आहे का? दादा कोंडकेंच्या घराची दयनीय अवस्था पाहून प्रथमेश परब ‘सुन्न’!!

या घराचं संवर्धन इतकं अवघड आहे का? दादा कोंडकेंच्या घराची दयनीय अवस्था पाहून प्रथमेश परब ‘सुन्न’!!

googlenewsNext
ठळक मुद्दे दादा कोंडके यांचे मूळ नाव कृष्णा कोंडके. दादांचा जन्म 8 ऑगस्ट 1932 रोजी एका सामान्य कुटुंबात गोकुळाष्टमीच्या दिवशी झाला. त्यामुळे त्यांचे नाव कृष्णा असे ठेवले गेले.

मराठी चित्रपटसृष्टीचा एक काळ गाजवणारे दिग्गज अभिनेते-निर्माते दादा कोंडके (Dada Kondke) यांना कोण बरे विसरू शकेल? दादा कोंडके यांच्या नावावर सिनेमे चालत. त्यांचा हटके अभिनय, जबरदस्त कॉमिक टायमिंग म्हणजे अफलातूनच. आजही त्यांच्या या हटके अभिनयाचे चाहते आहेत. अभिनेता प्रथमेस परब (Prathamesh Parab) यापैकीच एक. नुकतीच प्रथमेशने दादांच्या जुन्या घराला भेट दिली आणि त्या घराची अवस्था बघून तो सुन्न झाला. पोस्ट शेअर करत त्याने याकडे लक्ष वेधले. (  Prathamesh Parab shares Photo of Actor Dada Kondke House)
  दादा कोंडकेंच्या घराबाहेरील फोटो शेअर करत प्रथमेशने फेसबुकवर एक उद्विग्न पोस्ट लिहिली. ‘आयुष्यभर इतरांना हसवणारे दादा, आपल्याच घराला अशा अवस्थेत पाहून हसत असतील? असा सवाल प्रथमेश परबने या पोस्टमध्ये केला आहे.

तो लिहितो...
सुन्न...!!

विस्तीर्ण निळ्या नभाखाली दिसत असलेलं, मोडकळीस आलेलं घरं दुसरं तिसरं कोणाचं नसून, आपल्या महाराष्ट्राचे लाडके सुपरस्टार दादा कोंडके यांचं आहे. हे दादांचं रहातं घरं! हा फोटो झूम करून पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल की या घराची किती दयनीय अवस्था झाली आहे ते! आयुष्यभर इतरांना हसवणारे दादा, आपल्याच घराला अशा अवस्थेत पाहून हसत असतील?? ज्या व्यक्तीने, हाऊसफुलच्या बोर्ड्सने चित्रपटगृहाची शोभा वाढविली, आपल्या अभिनयाने, प्रेक्षकांच्या मनात हक्काचं घर निर्माण केलं, खरंच, आज त्याच व्यक्तीच्या घराचं संवर्धन करणं, इतकं अवघड आहे का????? प्रश्न अनेक आहेत!! काही सुन्न करणारे तर काही अनुत्तरित....!!
 दादा कोंडके यांचे मूळ नाव कृष्णा कोंडके. दादांचा जन्म 8 ऑगस्ट 1932 रोजी एका सामान्य कुटुंबात गोकुळाष्टमीच्या दिवशी झाला. त्यामुळे त्यांचे नाव कृष्णा असे ठेवले गेले. त्यांच्या कुटुंबीयांचे एक किराणा दुकान होते तसेच त्यांचे वडील हे मिलमध्ये कामगार होते.
 दादा कोंडके यांचे चित्रपट सृष्टीत पदार्पण झाले ते भालजी पेंढारकर यांच्या तांबडी माती या चित्रपटाद्वारे.  त्यानंतर प्रसिद्ध झालेल्या सोंगाड्या या चित्रपटाने दादांना यशाच्या शिखरावर विराजमान केले. सोंगाड्या हा चित्रपट रसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतला आणि मराठी चित्रपट सृष्टीला एक नवीन विनोदी अभिनेता मिळाला. 

Web Title: actor prathamesh parab visits dada kondakes old home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.