​ मोरोपंतांची भूमिका साकारणार हा अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2016 14:07 IST2016-12-16T14:07:17+5:302016-12-16T14:07:17+5:30

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित 'छत्रपती शिवाजी' या चित्रपटाची निर्मिती अभिनेता रितेश देशमुखने सुरू केली आहे. स्वत: रितेश यामध्ये ...

Actor to play Moropant's role | ​ मोरोपंतांची भूमिका साकारणार हा अभिनेता

​ मोरोपंतांची भूमिका साकारणार हा अभिनेता

्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित 'छत्रपती शिवाजी' या चित्रपटाची निर्मिती अभिनेता रितेश देशमुखने सुरू केली आहे. स्वत: रितेश यामध्ये महाराजांची मुख्य भूमिका साकारतोय. या ऐतिहासिक चित्रपटात अनेक महत्वाच्या व्यक्तीरेखा आहेत. त्यातीलच एक अत्यंत महत्वाची व्यक्तीरेखा म्हणजे मोरोपंत पिंगळे यांची. या भूमिकेसाठी प्रतिभावान अभिनेता सागर तळाशीकर याची निवड झाली असून मोरोपंतांचा फर्स्ट लूक सोशल मीडियामध्ये प्रसिध्द झाला आहे. मोरोपंत त्र्यंबक पिंगळे हे शिवाजीराजांच्या मंत्रिमंडळातील प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च मंत्री होते. स्वराज्याच्या सर्व राज्यकारभारावर यांना देखरेख ठेवावी लागत असे. महाराजांच्या गैरहजेरीत राजाचा प्रतिनिधी या नात्याने राज्यकारभार पंतप्रधानालाच सांभाळावा लागत असे, यावरुन या पदाचे महत्त्व लक्षात येते. मोरोपंतांच्या या भूमिकेसाठी सागरची निवड झाल्यामुळे त्याच्या चाहत्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मोरोपंत पिंगळेंचा हा फर्स्ट लूक सागर तळाशीकरने आपल्या फेसबुकवर शेअर केला आहे. हा लूक मेकअपमन सुहास गवते यांनी कुशलतेने बनवला आहे. शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटात अनेक हिंदी मराठीतील नामवंत कलाकार काम करणार असल्याचे समजते. 'छत्रपती शिवाजी' चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक रवी जाधव करीत आहेत. रवीने पहिल्यांदाच बॅन्जो या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन करुन बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. आता तो या ऐतिहासिक चित्रपटाला कशा प्रकारे दिग्दर्शित करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. या चित्रपटामध्ये अनेक हिंदी कलाकार असल्याचे बोलले जातेय. एवढेच नाही तर बॉलिवूडचा भाईजान सलमान खआन देखील यामध्ये झळकणार असल्याचे समजतेय. आता खरे काय ते आपल्याला लवकरच समजेल.

Web Title: Actor to play Moropant's role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.