या मराठी अभिनेत्याच्या घरी झाले चिमुकलीचे आगमन, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 15:30 IST2021-01-18T15:28:22+5:302021-01-18T15:30:43+5:30

या अभिनेत्याने चित्रपट आणि नाटकांचे दिग्दर्शन देखील केले आहे.

Actor nipun dharmadhikari blessed with baby girl | या मराठी अभिनेत्याच्या घरी झाले चिमुकलीचे आगमन, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज

या मराठी अभिनेत्याच्या घरी झाले चिमुकलीचे आगमन, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज

ठळक मुद्देनिपुणने सोशल मीडियावर त्याच्या मुलीचे दोन फोटो पोस्ट केले आहेत. एका फोटोत त्याच्या पत्नीच्या खुशीत त्याची मुलगी आपल्याला दिसत असून दुसऱ्या फोटोत त्याच्या खांद्यावर ती दिसत आहे.

निपुण धर्माधिकारीने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या आयुष्यात गोंडस परीचे आगमन झाले असून त्याने त्याच्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत ही गुड न्यूज त्याच्या चाहत्यांना दिली आहे.

निपुण धर्माधिकारी आणि संचिता चांदोरकर यांच्या लग्नाला पाच वर्षं झाले असून त्यांच्या आयुष्यात आलेल्या या नवीन पाहुणीमुळे ते दोघेही प्रचंड खूश आहेत. निपुणने सोशल मीडियावर त्याच्या मुलीचे दोन फोटो पोस्ट केले आहेत. एका फोटोत त्याच्या पत्नीच्या खुशीत त्याची मुलगी आपल्याला दिसत असून दुसऱ्या फोटोत त्याच्या खांद्यावर ती दिसत आहे. 

निपुण धर्माधिकारी हे आज घराघरात पोहोचलेले नाव आहे. ‘मराठी कास्टिंग काऊच’ या अत्यंत नाविन्यपूर्ण आणि वेगळ्या संकल्पनेच्या माध्यमातून तो युवकांमध्येही लोकप्रिय झाला. त्याचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. भाडिपा म्हणजेच भारतीय डिजिटल पार्टीमुळे तो विशेष प्रकाशझोतात आला. त्यासोबतच त्याने संगीत मानापमान, संगीत सौभद्र या संगीत नाटकांचं दिग्दर्शन केलं आहे. तर एमएक्स प्लेअरवरील वन्स अ इयर नावाच्या वेब सीरिजमध्येही त्याने काम केलं आहे. तसेच सचिन खेडेकर यांची मुख्य भूमिका असलेल्या बापजन्म या चित्रपटाचे त्याने दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. भविष्याचा वेध घेणारा दिग्दर्शक म्हणून निपुणची ख्याती आहे. पण त्याचबरोबर त्यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये कलाकार आणि लेखक म्हणूनही आपला ठसा उमटवला आहे. त्यात ‘नौटंकी साला’ (२०१३) आणि ‘हरीश्चंद्राची फॅक्टरी’ (२००९) यांचा समावेश आहे.

Web Title: Actor nipun dharmadhikari blessed with baby girl

टॅग्स :marathiमराठी