अभिनेता हंसराजच्या मारली थोबाडीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2016 14:09 IST2016-07-30T08:39:35+5:302016-07-30T14:09:35+5:30
अभिनेता हंसराज जगताप हा राष्ट्रीय पुरस्कार विजेता आहे. सध्या तो यारी दोस्ती या आगामी चित्रपटामध्ये व्यस्त आहे. याच चित्रपटाच्या ...

अभिनेता हंसराजच्या मारली थोबाडीत
अ िनेता हंसराज जगताप हा राष्ट्रीय पुरस्कार विजेता आहे. सध्या तो यारी दोस्ती या आगामी चित्रपटामध्ये व्यस्त आहे. याच चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान त्याचा सहकलाकार आशिष गाडे याने त्याच्या थोबाडीत मारली. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान आशिष हंसराजच्या कानाखाली मारतो असा एक सिन होता. काही केल्या तो सीन नाटकी वाटू नये असा अट्टाहास दिग्दर्शकांचा होता. चित्रपटाच्या उत्तरार्धात असणारा हा सीन नैसर्गिक वाटण्यासाठी आशिष रागात येत हंसराजच्या जोरात कानाखाली लावतो. त्याने इतक्या जोरात मारले की त्याच्या बोटांचे ठसे हंसराजच्या गालावर उमटले. इतका मोठा आवाज झाला की सारे जण हबकलेच. यावेळी हंसराजने प्रसंगावधान दाखवत आपला अभिनय सुरूच ठेवला, आपल्याकडून घडलेल्या या प्रकारामुळे गोंधळलेल्या आशीषनेसुद्धा मग तात्काळ स्वत:ला सावरत संवाद बोलत राहिला. त्यामुळे दिग्दर्शक तांबे यांनीही कॅमेरा रोलिंग सुरूच ठेवत हा सीन पूर्ण केला. सीन पूर्ण झाल्यानंतर मात्र आशिषने हंसराजला मिठी घट्ट मारून माफी मागितली. बिपीन शाह मोशन पिक्चर्स प्रस्तुत आणि पॅशनवल्ड एंटरटेनमेंट निर्मित यारी दोस्ती चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. श्रेयस राजे, मिताली मयेकर, निशा परुळेकर, अशोक पावडे, नम्रता जाधव आणि जनार्दन सिंग यांच्या ठळक भूमिका पहायला मिळणार आहेत.