अमिताभ बच्चन यांनी शेअर केला 'येरे येरे पैसा ३'चा ट्रेलर, मराठी सिनेमाला दिल्या शुभेच्छा, म्हणाले-

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 15:14 IST2025-07-02T15:13:33+5:302025-07-02T15:14:19+5:30

'येरे येरे पैसा ३'चा ट्रेलर अमिताभ बच्चन यांनी शेअर केला. अमिताभ यांनी मराठी सिनेमाला शुभेच्छा देऊन त्याचं कौतुक केलं

actor Amitabh Bachchan shared the trailer of Ye re Ye re Paisa 3 siddharth jadhav | अमिताभ बच्चन यांनी शेअर केला 'येरे येरे पैसा ३'चा ट्रेलर, मराठी सिनेमाला दिल्या शुभेच्छा, म्हणाले-

अमिताभ बच्चन यांनी शेअर केला 'येरे येरे पैसा ३'चा ट्रेलर, मराठी सिनेमाला दिल्या शुभेच्छा, म्हणाले-

'येरे येरे पैसा ३' सिनेमाची सध्या सर्वांना उत्सुकता आहे. या सिनेमाचा ट्रेलर काहीच दिवसांपूर्वी रिलीज झाला. सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे आणि दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या हस्ते 'येरे येरे पैसा ३'चा ट्रेलर लाँच करण्यात आला. या सिनेमाची खास गोष्ट म्हणजे खुद्द अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या सोशल मीडियावर हा ट्रेलर शेअर केला. याशिवाय या सिनेमाला खास शब्दात शुभेच्छा दिल्या आहेत.

अमिताभ यांनी 'येरे येरे पैसा ३'ला दिल्या शुभेच्छा

अमिताभ बच्चन यांनी  'येरे येरे पैसा ३'चा ट्रेलर शेअर केलाय. हा ट्रेलर अमिताभ यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर रिलीज केला आहे. All Good Wishes अशी पोस्ट लिहून बिग बींनी 'येरे येरे पैसा ३'ला शुभेच्छा दिल्या आहेत. अमिताभ यांनी मराठी सिनेमाला शुभेच्छा देणं आणि सिनेमाचं कौतुक करणं ही निश्चितच खूप चांगली गोष्ट आहे. यामुळे 'येरे येरे पैसा ३' सिनेमाला नक्कीच फायदा होईल, यात शंका नाही. अशाप्रकारे अमिताभ यांनी 'येरे येरे पैसा ३' सिनेमाचं कौतुक करुन शुभेच्छा दिल्याने हा सिनेमा पुन्हा चर्चेत आला आहे.

'येरे येरे पैसा ३' सिनेमा कधी रिलीज होणार?

धर्मा प्रॉडक्शन्स प्रस्तुत अमेय विनोद खोपकर पिक्चर्स, उदाहरणार्थ निर्मित, न्युक्लिअर ॲरो पिक्चर्स निर्मित या चित्रपटाची सहनिर्मिती वर्डविझार्ड एंटरटेनमेंटने केली आहे. सुधीर कोलते, ओमप्रकाश भट्ट, नासीर शरीफ, ओंकार सुषमा माने, स्वाती खोपकर, निनाद नंदकुमार बत्तीन, गिरीधर गोपाळकृष्ण धुमाळ हे चित्रपटाचे निर्माते असून सौरभ लालवाणी सहनिर्माते आहेत.

चित्रपटाचे दिग्दर्शन संजय जाधव यांनी केले आहे. कलाकारांच्या चमकदार यादीत संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधवउमेश कामततेजस्विनी पंडित, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे, नागेश भोसले, वनिता खरात, जयवंत वाडकर यांच्यासह आणखी काही चर्चित चेहरे दिसणार आहेत. ‘येरे येरे पैसा ३’ हा सिनेमा १८ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: actor Amitabh Bachchan shared the trailer of Ye re Ye re Paisa 3 siddharth jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.