या अभिनेत्याने ‘डॅडी’च्या मुलीशी केला साखरपुडा, नव्या वर्षात उडणार लग्नाचा बार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 01:34 PM2019-12-23T13:34:54+5:302019-12-23T13:39:23+5:30

बेधडक, दोस्तीगिरी, बस स्टॉप अशा अनेक मराठी चित्रपटात झळकलेला अभिनेता नव्या वर्षात लग्नबंधनात अडकणार आहे.

Actor Akshay Waghmare engaged to Arun Gawli's daughter Yogita | या अभिनेत्याने ‘डॅडी’च्या मुलीशी केला साखरपुडा, नव्या वर्षात उडणार लग्नाचा बार

या अभिनेत्याने ‘डॅडी’च्या मुलीशी केला साखरपुडा, नव्या वर्षात उडणार लग्नाचा बार

googlenewsNext
ठळक मुद्देअक्षयने  फत्तेशिकस्त, बेधडक, दोस्तीगिरी आणि बस स्टॉप  या मराठी चित्रपटांत काम केले आहे.  

बेधडक, दोस्तीगिरी, बस स्टॉप अशा अनेक मराठी चित्रपटात झळकलेला अभिनेता अक्षय वाघमारे नव्या वर्षात लग्नबंधनात अडकणार आहे. कुणाशी तर ‘डॅडी’ अर्थात गँगस्टर अरूण गवळीची मुलगी योगिता गवळी हिच्याशी. होय, नुकताच अक्षय व योगिताचा साखरपुडा पार पडला. एका हॉटेलात पार पडलेल्या या सारखरपुड्याच्या समारंभाला अक्षय व योगिताचे अतिशय जवळचे नातेवाईक व मित्र एवढेच काय ते उपस्थित होते.  अभिनेता क्षितीज दाते, मुग्धा परांजपे, विभावरी देशपांडे आणि हृषिकेश देशपांडे या कलाकारांनी या समारंभाला हजेरी लावली.

योगिता ही एक एनजीओ चालवते. या माध्यामातून महिलांच्या आरोग्यासाठी ती काम करते. योगिता व अक्षय गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. कुटुंबीयांनी त्यांना लग्न करण्याचा सल्ला दिला आणि योगिता-अक्षयने हा सल्ला मानत साखरपुडा उरकला.

पुणे टाईम्सशी बोलताना खुद्द अक्षयने या वृत्ताला दुजोरा दिला. मी गेल्या पाच वर्षांपासून योगिताला ओळखतो. आमच्या कुटुंबीयांनी आम्हाला लग्न करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार आम्ही दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. आम्ही दोघेही आनंदात आहोत. आमच्या या लग्नाला अरेंज मॅच म्हणण्याऐवजी मी ‘अरेंज लव्ह मॅच’ म्हणेल, असे अक्षयने यावेळी सांगितले. योगिता व अक्षय येत्या फेबु्रवारी महिन्यात लग्न करणार आहेत.


अक्षयने  फत्तेशिकस्त, बेधडक, दोस्तीगिरी आणि बस स्टॉप  या मराठी चित्रपटांत काम केले आहे.  फत्तेशिकस्त या सिनेमात अक्षयने  सरदार कोयाजी नाईक बांदल यांची भूमिका साकारली होती,

Web Title: Actor Akshay Waghmare engaged to Arun Gawli's daughter Yogita

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.