परशा उर्फ आकाश ठोसरचा वर्कआउटचा व्हिडीओ पाहून चाहते झाले चकीत, पहा हा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 15:11 IST2021-05-31T15:00:30+5:302021-05-31T15:11:04+5:30
कायम विविध कारणासाठी चर्चेत असलेला आकाश सध्या लॉकडाउन असलं तरी आपल्या फिटनेसकडे मात्र विशेष लक्ष देताना दिसत आहे.

परशा उर्फ आकाश ठोसरचा वर्कआउटचा व्हिडीओ पाहून चाहते झाले चकीत, पहा हा व्हिडीओ
सैराट झालं जी म्हणत प्रेक्षकांच्या घरात घर करणारा पर्श्या म्हणजेच अभिनेता आकाश ठोसर याच्या करीयरची घोडदौड सुरूच आहे. सैराटनंतर एका रात्रीत स्टार झालेला हा अभिनेता पुढे अनेक वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये झळकताना दिसला. मराठीसाठी सीमित न राहता त्याने पुढे हिंदी वेबसीरिज शिवाय हिंदी सिनेमे सुद्धा केले... एवढेच काय तर मोठ्या ॲड मध्ये सुद्धा तो झळकला. कायम विविध कारणासाठी चर्चेत असलेला आकाश सध्या लॉकडाउन असलं तरी आपल्या फिटनेसकडे मात्र विशेष लक्ष देताना दिसत आहे.
नुकताच त्याने आपल्या सोशल मीडियावर एक नवीन व्हिडिओ शेअर करत स्टे मोटिवेटेड असं कॅप्शन त्याला दिला आहे.. या व्हिडिओमध्ये आकाश वेटलिफ्टिंग करताना दिसतो तर काही दिवसांपूर्वी त्यांनी असाच त्याच्या फिटनेस रुटीन चा एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये तो पुल अप्स मारताना दिसत होता. या सगळ्या व्हिडिओमध्ये आकाश चा फिटनेस अधोरेखित झाल्याशिवाय राहत नाही. त्याचे अॅब्स आणि तो घेत असलेली मेहनत दिसून येते. अशीच मेहनत तो काही महिन्यांपूर्वी सुद्धा घेताना दिसला होता तेव्हा मात्र तो त्याच्या आगामी वेब सिरीज १९६२ the war in the hills साठी ही मेहनत घेत असल्याचं नंतर समोर आलं होतं.
या वेब सिरीज मध्ये आकाश एका सैनिकाच्या भूमिकेत दिसला होता.आणि म्हणून असतो विशेष मेहनत आपल्या फिटनेस वर घेताना दिसला होत. अनेकदाया वेबसिरीस चे बिहाइंड व्हिडिओ सुद्धा आकाश शेअर करताना दिसला.