आर्या आंबेकरने पहिल्यांदाच केली 'ही' गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 18:24 IST2019-01-23T18:18:57+5:302019-01-23T18:24:10+5:30

'सारेगमप लिटिल चॅम्प्स' या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आर्या आंबेकर हे नाव घराघरात पोहोचले. आर्याला गायनाचे बाळकडू तिच्या घरातूनच मिळाले.

Aarya ambekar first sing lavani song | आर्या आंबेकरने पहिल्यांदाच केली 'ही' गोष्ट

आर्या आंबेकरने पहिल्यांदाच केली 'ही' गोष्ट

ठळक मुद्देआर्याने वयाच्या साडेपाच वर्षांपासून गायनाचे धडे गिरवायला सुरुवात केलीआर्याने आतापर्यंत अनेक सिनेमा आणि नाटकांसाठी गाणी गायली आहेत

 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आर्या आंबेकर हे नाव घराघरात पोहोचले. आर्याला गायनाचे बाळकडू तिच्या घरातूनच मिळाले. आर्याने वयाच्या साडेपाच वर्षांपासून गायनाचे धडे गिरवायला सुरुवात केली. आर्याने आतापर्यंत अनेक सिनेमा आणि नाटकांसाठी गाणी गायली आहेत. आर्याने नुकतील लावणी गायिला आहे. लावणी गाण्याची आर्याची ही पहिलीच वेळ आहे. या माहिती स्वत: आर्याने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करुन दिली आहे. आर्याच्या या पोस्टला तिच्या चाहत्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. आता आर्याने कोणत्या सिनेमासाठी लावणी गायिली याची माहिती अजून मिळू शकलेली नाही. मात्र ती लवकरच देण्याचे आर्याने त्या पोस्टच्या खाली लिहिले आहे.  त्यामुळे आर्याच्या पुढच्या पोस्टची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत असतील यात काही शंका नाही. 


आर्याने गाण्यासोबत कथ्थकचे देखील धडे घेतले आहे. आर्याने अभिनय बेर्डेसोबत सिनेमात पदार्पण केले. 'ती सध्या काय करते'मधून तिने अभिनय बेर्डेसोबत डेब्यू केला होता.

पहिल्या प्रेमाची आठवण करून देणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटात अंकुश चौधरी, तेजश्री प्रधान, उर्मिला कानेटकर-कोठारे या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. अभिनय बेर्डे आणि आर्या आंबेकर हे दोन नवे चेहरे मराठी इंडस्ट्रीला मिळालेले आहेत. आर्याने काही दिवसांपूर्वी आलेल्या तुला पाहते रे मालिकेचे टायटल ट्रॅकदेखील गायले आहे. 

Web Title: Aarya ambekar first sing lavani song

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.