आरती हा चित्रपट नव्हे तर एक चळवळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2017 12:34 IST2017-08-16T07:04:09+5:302017-08-16T12:34:09+5:30

सगळे काही सुरळीत सुरू असताना आयुष्य कधी कधी अशा वळणावर उभे करते की, त्यातून मार्ग काढणे सहज शक्य होत ...

Aarti is not a film, but a movement | आरती हा चित्रपट नव्हे तर एक चळवळ

आरती हा चित्रपट नव्हे तर एक चळवळ

ळे काही सुरळीत सुरू असताना आयुष्य कधी कधी अशा वळणावर उभे करते की, त्यातून मार्ग काढणे सहज शक्य होत नाही. पण काहीजण आपल्या जिद्धीने मार्ग काढत एक नवा अध्याय निर्माण करतात. आरती चित्रपटाच्या दिग्दर्शिका सारिका मेणे आणि त्यांचा भाऊ सनी पवार यांनी सुद्धा आलेल्या प्रसंगाशी दोन हात करत आयुष्याची लढाई जिंकून दाखवली.
एका सामान्य कुटुंबातील ही दोन भावंडं इतरांसारखेच आयुष्य जगत होती. पण कुटुंबावर ओढवलेल्या एका प्रसंगाने त्यांचे आयुष्यच पालटून गेले. सनी आणि त्यांची प्रेयसी आरती यांचे प्रेम बहरत असताना अचानक एका दुर्देवी अपघातामुळे आरतीची साथ सुटली आणि संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. आरतीच्या जाण्यानंतरचा काळ खडतर होता. पण कुटुंबाचे भक्कम पाठबळ तसेच शिक्षण आणि संस्काराची शिदोरी यामुळे या प्रसंगावर मात करत ही दोन्ही भावंडं आज आपापल्या क्षेत्रात चांगले काम करतायेत. सारिका कलेच्या तर सनी यांनी समाजसेवेच्या क्षेत्रात चांगले काम करतायेत. 
वैयक्तिक आयुष्यात घडलेली ही गोष्ट रुपेरी पडद्यावर साकारावी यासाठी सनी आणि सारिका यांचे कुटुंबीय आग्रही होते. पण चित्रपट निर्मिती सोपी नव्हती. सगळी सोंगं आणता येतात. पण पैशाचे सोंग आणता येत नाही. तसेच भावनिकतेचा प्रश्नही होताच. त्यावर जिद्दीने मात करत आरती चित्रपटाचे स्वप्न साकारण्यासाठी त्यांनी प्रचंड प्रयत्न केले. नात्याचे बंध सैलावत असताना मानवी मूल्यांचा आदर करणारी ही गोष्ट सर्वांपुढे यावी यासाठी चित्रपटाच्या निर्मितीची धडपड सनी आणि सारिका यांनी केली. कुटुंबाच्या भक्कम साथीने आरती चित्रपटाचे त्यांचे स्वप्न साकार झाले आहे. आज हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट नसून चळवळ आहे एका चांगल्या आदर्श समाजासाठी...

Also Read : पार्वतीच्या नंदना मोरया गजानना हे आरती - द अननोन लव्हस्टोरी मधील गाणे आवडतंय प्रेक्षकांना

Web Title: Aarti is not a film, but a movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.