बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानच्या अभिनयाचे चाहते तर आपल्याला सगळीकडेच पाहायला मिळतील. आमीरचा ...
आमीरच्या कामाने भारावली सोनाली
/> बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानच्या अभिनयाचे चाहते तर आपल्याला सगळीकडेच पाहायला मिळतील. आमीरचा सामाजिक कामात देखील तितकाच सहभाग आपल्याला दिसतो. आणि म्हणूनच आमीरच्या या कामावर मराठीमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी चांगलीच खुष झाली आहे. सोनाली नूकतीच एका कार्यक्रमादरम्यान आमीर खानला भेटली. यावेळी आमीरची पत्नी किरण राव देखील तिथे होत्या. मग काय आमीरच्या कामाने भारावून गेलेल्या सोनालीने आमीर सोबत एक मस्त फोटो काढून घेतला. याबद्दल सीएनएक्सला दिलेल्या मुलाखतीत सोनाली म्हणते, मी आमीरच्या कामाची खरच चाहती आहे. आमीर आणि किरण या दोघांच्या सामाजिक कार्याने मी भारावून गेली आहे. पाणी वाचविण्यासाठी आमीरने केलेले प्रयत्न आणि त्याचे योगदान खरच उल्लेखनीय आहे. आमीरच्या या धाडसी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचे मला कौतुक वाटते. सोनालीने आमीर आणि किरण सोबत काढलेला फोटो सोशल मिडियावर देखील अपलोड केला आहे. या फोटोला मात्र सोनालीच्या चाहत्यांकडून लाईक्स मिळत आहेत. या फोटोमध्ये तर सोनाली आणि आमीर एकदम झक्कास दिसत आहेत पण या दोघांची जोडी आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळते का ते लवकरच कळेल.