"वहिनींना नमस्कार", सोहम बांदेकरचा 'त्या' मुलीबरोबरचा फोटो व्हायरल, अभिनेता म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 13:07 IST2023-07-12T12:59:32+5:302023-07-12T13:07:30+5:30
आदेश बांदेकरांच्या लेकाचा मुलीबरोबरचा फोटो व्हायरल, अभिनेता म्हणाला, "आई माझ्यावर..."

"वहिनींना नमस्कार", सोहम बांदेकरचा 'त्या' मुलीबरोबरचा फोटो व्हायरल, अभिनेता म्हणाला...
आदेश बांदेकर व सुचित्रा बांदेकर हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय कपल आहेत. सिनेसृष्टीतील आदर्श जोडी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आदेश व सुचित्रा यांचा लेक सोहम बांदेकरही अभिनेता आहे. मालिकांमध्ये काम करुन तो घराघरात पोहोचला. सोहम सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. सध्या त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
बहुचर्चित 'बाईपण भारी देवा' या चित्रपटात अभिनेत्री सुचित्रा बांदेकर मुख्य भूमिकेत आहेत. तर सोहमने या चित्रपटात त्यांच्या मुलाची छोटीशी भूमिका साकारली आहे. या चित्रपटात तो सुचित्रा यांच्याबरोबर व्हिडिओ कॉलवर बोलताना दिसतो. यामध्ये एक मुलगीही त्याच्याबरोबर दिसते. चित्रपटात सोहमबरोबर दिसलेल्या या मुलीची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. एका चाहत्याने चित्रपटातील सोहमचा हा फोटो पोस्ट करत "दादा तुमचे दर्शन...वहिनींनी नमस्कार...", असं कॅप्शन देत हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.
३१ वर्षांपूर्वीच झालेली किंग खान सुपरस्टार होणार असल्याची भविष्यवाणी, हेमा मालिनी यांचा खुलासा
सोहमने चाहत्याची ही स्टोरी इन्स्टाग्रामला शेअर करत त्याला रिप्लाय दिला आहे. "कन्फ्युजन क्लिअर करतो...मी बाईपण भारी देवा या चित्रपटात केमिओ केला आहे...केदार शिंदे काकाने ही संधी दिल्याबद्दल धन्यवाद...," असं म्हटलं आहे. पुढे त्याने "मी त्या मुलीला खरंच ओळखत नाही आणि यावरुन माझी आई माझ्यावर अजिबात चिडलेली नाही," असंही म्हटलं आहे.
"माझ्या कामाचं कौतुक केलं आणि मेहनत घेऊन फोटो काठून मला पाठवले...त्या सगळ्यांना थँक्यू," असंही पुढे सोहमने म्हटलं आहे. सोहमच्या या स्टोरीची बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे.