'एक नवीन सुरूवात...!', प्रथमेश परबने पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली ही खुशखबर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2023 18:39 IST2023-05-16T18:38:52+5:302023-05-16T18:39:38+5:30
Prathamesh Parab : प्रथमेश परबची इंस्टाग्रामवरील पोस्ट चर्चेत आली आहे.

'एक नवीन सुरूवात...!', प्रथमेश परबने पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली ही खुशखबर
मराठी प्रसिद्ध अभिनेता प्रथमेश परब लवकरच आपल्या चाहत्यांसाठी एक नवा कोरा सिनेमा घेऊन येत आहे. १४ मे रोजी म्हणजेच मदर्स डेच्या दिवशी प्रथमेश परबने आपल्या आगामी चित्रपटाबद्दल सोशल मीडियाद्वारे माहिती दिली. मातृ दिनाच्या मुहूर्तावर त्याच्या या नव्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. हा चित्रपट आई आणि मुलाच्या नात्यावर भाष्य करणारा असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. प्रथमेशला आतापर्यंत आपण रॉम कॉम आणि युवा पिढीवर आधारित चित्रपटात काम करताना पाहिले आहे. मात्र हा चित्रपट त्याने यापूर्वी साकारलेल्या सर्व भूमिकांना छेद देणारा असणार आहे. तूर्तास, या चित्रपटाबद्दल अधिक माहिती हातात आली नसली तरी प्रथमेशची पोस्ट बरेच काही सांगून जाते.
प्रथमेश लिहिले की, "एक नवीन सुरुवात. खूप सुंदर विषय,आणि मातृदिन सोबत या सिनेमाचे खूप गोड नातं आहे." प्रथमेश ने दिलेल्या या कॅप्शन मुळे हा चित्रपट एका वेगळ्याच धाटणीचा असणार आहे, यात वाद नाही. शिवाय प्रथमेश देखील एका वेगळ्या रूपात या निमित्ताने पाहायला मिळणार आहे.
मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती डेविडड नाडर यांच्या प्रोडक्शन नंबर वन ही संस्था करणार असून, मोहसीन खान या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटात प्रथमेश परबसोबत गर्ल्स चित्रपटात झळकलेली अंकिता लांडेदेखील पाहायला मिळणार आहे.