पोटमाळ्यात सापडली 905 कोटींची पेंटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2016 20:47 IST2016-04-14T03:47:46+5:302016-04-13T20:47:46+5:30

दसऱ्यानिमित्त घर सफाई करताना अडगळीत किंवा माळ्यावर ठेवलेल्या अशा अनेक वस्तू सापडतात ज्यांना आपण पूर्णपणे विसलेले असतो. फ्रान्समध्ये राहणाऱ्या ...

905 crore paintings found in the room | पोटमाळ्यात सापडली 905 कोटींची पेंटिंग

पोटमाळ्यात सापडली 905 कोटींची पेंटिंग

ऱ्यानिमित्त घर सफाई करताना अडगळीत किंवा माळ्यावर ठेवलेल्या अशा अनेक वस्तू सापडतात ज्यांना आपण पूर्णपणे विसलेले असतो. फ्रान्समध्ये राहणाऱ्या एका कुटुंबालादेखील माळ्यावर एक अशी गोष्ट सापडली आहे ज्यामुळे त्यांचे अख्खे आयुष्यच बदलू शकते.

टौलुझ शहरामधील एका घरात राहणाऱ्या कुटुंबाला दोन वर्षांपूर्वी त्यांच्या माळ्यावर प्रसिद्धी इटालियन रेनेसन्स चित्रकार कॅराव्हॅजियो यांनी काढलेली पेंटिंग सापडली. तज्ज्ञांकडून तपासणी केली असता ही ‘ओरिजनल’ पेंटिंग असल्याचे निष्पण्ण झाले.

आज या पेंटिंगचे बाजारमूल्य सुमारे 120 मिलयन युरो (905 कोटी रू.) एवढे आहे. ‘बुक आॅफ जुडिथ’मधील जनरल होलोफर्न्स यांचा शिरच्छेद करणाऱ्या प्रसंगाची ही पेंटिग आहे.

तज्ज्ञांच्या मते, ती अत्यंत चांगल्या स्थितीत असून 1600 ते 1610 या काळाच्या दरम्यान ती बनवली गेली असावी. एक्सपर्ट एरिक टरक्विन यांनी सांगितले की, कॅराव्हॅजियोची ऊर्जा, स्टाईल, प्रकाशयोजना या पेंटिंगमध्ये ठळकपणे दिसतात.

इतर अनेक तज्ज्ञ मात्र या पेंटिंगच्या ‘खऱ्यापणा’वर शंका घेत असले तरी आघाडीच्या कॅराव्हॅजियो तज्ज्ञ आणि नेपल्स संग्राहलयाच्या पूर्व संचालिका निकोला स्पिनोरा यांनी टरक्विन यांना पाठिंबा दिला आहे.

Web Title: 905 crore paintings found in the room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.