बायोपिक करायचं म्हणून २५ वेळा पाहिला अलबेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2016 16:24 IST2016-06-19T10:51:39+5:302016-06-19T16:24:21+5:30

 भगवान दादांची ती स्टाईल, ते एक्सप्रेशन, त्यांची ती नृत्याची शैली आत्मसात करण्यासाठी अलबेला हा चित्रपट मी एक, दोन नव्हे ...

25 times seen as a biopic | बायोपिक करायचं म्हणून २५ वेळा पाहिला अलबेला

बायोपिक करायचं म्हणून २५ वेळा पाहिला अलबेला

 
गवान दादांची ती स्टाईल, ते एक्सप्रेशन, त्यांची ती नृत्याची शैली आत्मसात करण्यासाठी अलबेला हा चित्रपट मी एक, दोन नव्हे तर तब्बल २५ वेळा पाहिला असल्याचे अभिनेता मंगेश देसाई यांनी लोकमत आॅफिस भेटीदरम्यान सांगितले. मंगेश म्हणाला, मी खूप लहान असताना शनिवार रविवार ब्लॅक व्हाइट टीव्हीवर भर गर्दीत बसून भगवान दादांचा अलबेला हा चित्रपट पाहिला होता. लग्नसोहळे वगैरे असेल तर भगवान दादांच्या भोली सुरत दिल के खोटे या गाण्यांवर देखील भरपूर डान्स केला आहे. पण आज प्रत्यक्षात त्यांची भूमिका करायला मिळणे ही माझ्यासाठी खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. तसेच भगवान दादांसारखे हुबेहुब दिसण्याची लकब ही दिग्दर्शक शेखर सरतांडेल, मेकअपमॅन विदयाधर भूट्टे व कॅमेरामन उदय धिवारे यांच्या प्रयत्नांमुळे झाली असल्याचे देखील यावेळी मंगेश देसाई यांनी सांगितले. २४ जूनला प्रदर्शित होणारा भगवान दादांच्या जीवनावर आधारित असणारा एक अलबेला या चित्रपटात भगवान दादांची भूमिका मंगेश देसाई यांनी साकारली आहे. तर गीता बालीच्या भूमिकेत विदया बालन पाहायला मिळणार आहे. 





 

Web Title: 25 times seen as a biopic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.