१२५० बालकलाकारांचा 'गीतरामायणा'तून विश्‍वविक्रमी कलाविष्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2016 14:49 IST2016-12-16T14:49:25+5:302016-12-16T14:49:25+5:30

शाळेतील १२५० विद्यार्थ्यांनी आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांनी लिहिलेले आणि सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेल्या बाल गीतरामायणाने रमणबाग ...

1250 World Heritage Artists from Geetaramayana | १२५० बालकलाकारांचा 'गीतरामायणा'तून विश्‍वविक्रमी कलाविष्कार

१२५० बालकलाकारांचा 'गीतरामायणा'तून विश्‍वविक्रमी कलाविष्कार

ळेतील १२५० विद्यार्थ्यांनी आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांनी लिहिलेले आणि सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेल्या बाल गीतरामायणाने रमणबाग शाळेच्या मैदानावर उपस्थित १५ हजारहून अधिक रसिकांना मंत्रमुग्ध केले.

वंडरबुक ऑफ रेकॉर्डस, वर्ल्ड रेकॉर्डस ऑफ इंडिया आणि लिम्का बुक यांच्याकडे ६ ते ११ वयोगटातील १२५० अधिक विद्यार्थ्यांनी सादर केलेले सर्वात मोठे आध्यात्मिक नाट्य या गटात विक्रमासाठी या उपक्रमाची नोंद घेण्यात आली आहे.

'स्वयें श्रीराम प्रभू ऐकती' या लवकुशाच्या गीताने महानाट्याचा प्रारंभ होतो. त्यानंतर दशरथाचे पायसदान, रामजन्म, यज्ञ रक्षणासाठी सज्ज झालेला राम, त्राटिका वध, अहिल्या उध्दार, सिता स्वयंवर, राम सितेचा विवाह, रामाचा राज्याभिषेक, वनवास, हनुमान भेट, लंका स्वारी, रावण वध अशी प्रेक्षकांची उत्कंठा वाढवीत नेणार्‍या रोमांचकारी प्रसंग विद्यार्थ्यांनी संगीत-नृत्य-नाट्याद्वारे सादर केले. सवाई गंधर्वच्या भव्य व्यासपीठावर हा कार्यक‘म सादर करण्यात आला.

मुलांमध्ये सभाधीटपणा, सहकार्य, समूहभावना, स्वयंशिस्त, वक्तशीरपणा आदी गुण वाढावेत आणि पवित्र रामकथा या माध्यमातून जगात सर्वदूर पोहोचावी यासाठी या उपक्रमाचे आयोजन केल्याची माहिती मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांनी दिली. उपमहापौर मुकारी अलगुडे, सोसायटीच्या नियामक मंडळाचे संचालक किरण शाळिग्राम, शाळा समितीचे अध्यक्ष दिलीप कोटिभास्कर यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिका तनुजा तिकोने, धनंजय तळपे यांनी संयोजन केले. अर्चना देव व भाग्यश्री हजारे यांनी पटकथालेखन केले. कलाशिक्षिका सारिका दुसाने यांनी नेपथ्याची तयारी केली. पालक संतोष राऊत यांनी दिग्दर्शन, वेषभूषेसाठी प्रसाद सुपेकर यांनी सहकार्य केले. माजी विद्यार्थी आणि शिक्षक-पालक संघाचे विशेष सहकार्य मिळाले.

Web Title: 1250 World Heritage Artists from Geetaramayana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.