"फटाके वाजवत नाही, तर पाकिस्तानात जा असं म्हणणाऱ्या...", ट्रोलर्सला मराठी अभिनेत्रीचं सणसणीत उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 02:03 PM2024-04-24T14:03:50+5:302024-04-24T14:04:53+5:30

"उद्या मी वेस्टर्न टॉयलेट सीटवर का बसते?" असं म्हणून ट्रोल करतील- मराठी अभिनेत्री संतापली

marathi actress surabhi bhave reply to trollers post goes viral | "फटाके वाजवत नाही, तर पाकिस्तानात जा असं म्हणणाऱ्या...", ट्रोलर्सला मराठी अभिनेत्रीचं सणसणीत उत्तर

"फटाके वाजवत नाही, तर पाकिस्तानात जा असं म्हणणाऱ्या...", ट्रोलर्सला मराठी अभिनेत्रीचं सणसणीत उत्तर

अनेक कलाकारांना ट्रोलर्समुळे मनस्तापाला सामोरं जावं लागलं आहे. अभिनेता चिन्मय मांडलेकरला मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे सध्या ट्रोल केलं जात आहे. लेकाच्या नावावरुन ट्रोल केल्यामुळे चिन्मयच्या समर्थनार्थ अनेक मराठी कलाकारांनी पोस्ट करत त्याला पाठिंबा देत ट्रोलर्सला खडे बोल सुनावले. आता प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने पोस्टद्वारे ट्रोलर्सला सणसणीत उत्तर दिलं आहे. 

अभिनेत्री सुरभी भावे हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय चेहरा आहे. अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम करुन सुरभीने अभिनयाची छाप पाडली. अभिनयाबरोबरच सुरभी तिच्या बेधडक स्वभावासाठीही ओळखली जाते. सुरभी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. सुरभीने नुकतंच एक फोटो पोस्ट करत ट्रोलर्सला सुनावलं आहे. "ही आहे माझी reaction...",  असं कॅप्शन तिने या पोस्टला दिलं आहे. 

पुढे ती म्हणते, "कलाकारांना सॉफ्ट टार्गेट करणं फार सोपं आहे. मग अगदी विषय कोणताही असो...उद्या मी वेस्टर्न टॉयलेट सीट वर का बसते? खाली बसणं ही खरी परंपरा इथवर सुद्धा लोकं बोलतील...मध्यंतरी मी फटाके वाजवत नाही अशा आशयाची पोस्ट केली तर लोकं म्हणे हिंदू धर्माला काळिमा आहेस, पाकिस्तान मध्ये जा...really??!! इतका उथळ विचार असणाऱ्या सर्वांसाठी माझी ही रिएक्शन आहे". सुरभीच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. 

'स्वामिनी' मालिकेतून सुरभी घराघरात पोहोचली. सध्या ती 'राणी मी होणार' या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'ही अनोखी गाठ' या सिनेमात सुरभी महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. 

Web Title: marathi actress surabhi bhave reply to trollers post goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.