"महाराष्ट्रात राहायची लायकी नाही", बिकिनीतील फोटोंवर आक्षेपार्ह कमेंट, अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 16:31 IST2025-10-14T16:28:55+5:302025-10-14T16:31:26+5:30
ट्रोल करणाऱ्या आणि घाणेरड्या कमेंट करणाऱ्यांना मराठी अभिनेत्री दिशा परदेशी हिने सडेतोड उत्तर दिलं आहे. दिशा परदेशीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरुन याबाबत पोस्ट शेअर केली आहे.

"महाराष्ट्रात राहायची लायकी नाही", बिकिनीतील फोटोंवर आक्षेपार्ह कमेंट, अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली...
सेलिब्रिटींच्या फोटोंवर आणि व्हिडीओंवर चाहते कमेंट करत असतात. कधी कधी सेलिब्रिटींनी ट्रोलही केलं जातं. अशाच ट्रोल करणाऱ्या आणि घाणेरड्या कमेंट करणाऱ्यांना मराठी अभिनेत्री दिशा परदेशी हिने सडेतोड उत्तर दिलं आहे. दिशा परदेशीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरुन याबाबत पोस्ट शेअर केली आहे.
अनेक मालिकांमध्ये काम केलेली अभिनेत्री दिशा परदेशी ही मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. काही सिनेमांमध्येही दिशा झळकली आहे. दिशा सोशल मीडियावर सक्रिय असून ती वैयक्तिक आणि करिअरचे अपडेट्स चाहत्यांना देत असते. अनेकदा दिशा तिचे बोल्ड फोटोही शेअर करताना दिसते. दिशाने काही दिवसांपूर्वीच तिचे बिकिनीतील स्विमिंगपूलमधील बोल्ड फोटो शेअर केले होते. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनीही कमेंट केल्या होत्या. मात्र काहींनी या फोटोंवर आक्षेपार्ह कमेंट केली. तर काहींनी शिवीगाळही केली.
एकाने कमेंट करत "महाराष्ट्रात राहायची लायकी नाही तुमची" असं म्हटलं होतं. तर दुसऱ्याने "हे देवा आम्हाला काय बघावं लागतंय...", असं म्हणत शिवीगाळही केली. कमेंटमध्ये शिवीगाळ करणाऱ्यांना दिशाने सडेतोड उत्तर दिलं आहे. "ह्या माननीय महोदयांना आता काय रिप्लाय करू हे समजत नाहीये. आपल्याला काही समजत असेल तर मला सांगावे", असं दिशाने म्हटलं आहे.