"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
By देवेंद्र जाधव | Updated: July 5, 2025 09:36 IST2025-07-05T09:34:53+5:302025-07-05T09:36:24+5:30
शिवरायांचा छावा सिनेमातून भेटीला आलेला अभिनेता भूषण पाटीलने संताप व्यक्त केलाय. त्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय. काय आहे नेमकं प्रकरण?

"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
'शिवरायांचा छावा' या सिनेमातून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणजे भूषण पाटील. या सिनेमात भूषणने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली. भूषणला या सिनेमामुळे खूप लोकप्रियता मिळाली. अशातच भूषणचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत भूषणने त्याचा संताप व्यक्त केला आहे. सध्या ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांना त्यांच्या वक्तव्यांमुळे ट्रोलिंगला सामोरं जावं लागतंय. याच मुद्द्याला धरुन भूषण पाटीलने व्हिडीओ बनवत ट्रोलर्सला सुनावलं आहे.
भूषण पाटीलच्या व्हिडीओची चर्चा
भूषण पाटील म्हणतो, "आजकाल एक नवीन ट्रेंड चाललाय. मराठी कलाकारांना ट्रोल करण्याचा. नुकतंच सचिन पिळगावकर सरांच्या इंटरव्ह्यूमधल्या काही कमेंट्स त्याच्यानंतर संतोष जुवेकरवर खूप ट्रोलिंग केलं गेलं. आणि आणखी इतर कलाकार. मला माहित नाही, हे कोण करतंय? हे जाणूनबुजून केलं जातंय. पण मला या ट्रोलर्सला त्यांच्याच भाषेत सांगायचंय, तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते ना तेव्हापासून हा माणूस अभिनय करतोय. त्यामुळे Shut the fxxk up. आणि इतर कलाकारांना ट्रोल करण्यापेक्षा स्वतःच्या आयुष्यावर लक्ष द्या. तुमच्या भल्याचं सांगतोय."
अशाप्रकारे भूषणने व्हिडीओच्या माध्यमातून त्याचा राग व्यक्त केलाय. "स्वतःच्या भाषेचा आणि कलाकारांचा आदर करायला शिका", असं कॅप्शन भूषणने या व्हिडीओखाली दिलंय. भूषणने हा रोखठोक व्हिडीओ शेअर करताच अनेकांनी त्याचं समर्थन केलंय. गेल्या काही दिवसांपासून सचिन पिळगावकरांना ज्या पद्धतीने ट्रोलिंगला सामोरं जावं लागतंय, त्यावर भूषणने ट्रोलर्सला सुनावलं आहे. भूषणच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, 'शिवरायांचा छावा' सिनेमानंतर त्याने 'मनमौजी' या सिनेमात अभिनय केला.