मराठमोळ्या अभिनेत्रीही ‘बोल्ड’

By Admin | Updated: July 9, 2015 04:30 IST2015-07-09T01:26:24+5:302015-07-09T04:30:48+5:30

सई ताम्हणकर, राधिका आपटे, नेहा पेंडसे, श्रुती मराठे यांच्या पंक्तीत आता तेजस्विनी लोणारी हे नाव लवकरच अ‍ॅड होणार आहे.

Maratha actress 'bold' | मराठमोळ्या अभिनेत्रीही ‘बोल्ड’

मराठमोळ्या अभिनेत्रीही ‘बोल्ड’


बॉलीवूड अभिनेत्री ‘स्टाईल’ अंगप्रदर्शनाचा टे्रंड मराठी चित्रपटसृष्टीमध्येदेखील रुजत चालला आहे... सई ताम्हणकर, राधिका आपटे, नेहा पेंडसे, श्रुती मराठे यांच्या पंक्तीत आता तेजस्विनी लोणारी हे नाव लवकरच अ‍ॅड होणार आहे... ‘नो एंट्री... पुढे धोका आहे...’ या चित्रपटात पहिल्यांदाच सईने बिकिनी घालून मराठी प्रेक्षकांना धक्का दिला होता... तर राधिका आपटेच्या यू ट्यूबवरील न्यूड चित्रफितीने खळबळ उडवून दिली होती. अभिनयाचा कस लागो ना लागो, पण अंगप्रदर्शनात ‘बॉलीवूड से हम भी कम नहीं...’ अशा आविर्भावात ‘बोल्ड’ प्रतिमेमध्ये शिरायलाही या अभिनेत्रींची फुल टू तयारी झाली आहे. ‘चिनू’ आणि ‘बाप रे बाप डोक्याला ताप’ या चित्रपटांमधून प्रेक्षकांना अभिनयाचे दर्शन घडविणाऱ्या तेजस्विनी लोणारीने करिअरसाठीच नव्हे, तर प्रतिमा बदलविण्यासाठीदेखील किसिंग सीनच काय, पण कथेची मागणी असल्यास बिकिनी घालायलाही तयार असल्याचे या पोरीने जाहीर करून टाकले आहे... काय ते डेअरिंग!

Web Title: Maratha actress 'bold'