अनेक नायिकांनी केले लहान वयाच्या तरुणाशी लग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2016 01:36 IST2016-03-06T01:36:07+5:302016-03-06T01:36:07+5:30

प्रिती झिंटा व उर्मिला मातोंडकर या दोन्ही नायिका लग्नाच्या बाबतीत जरा मागेच राहिल्या होत्या. त्यांच्या वयाच्या इतर नायिकांची मुले पाच-पाच वर्षांची झाली असतानाही

Many heroes married to a young boy | अनेक नायिकांनी केले लहान वयाच्या तरुणाशी लग्न

अनेक नायिकांनी केले लहान वयाच्या तरुणाशी लग्न

प्रिती झिंटा व उर्मिला मातोंडकर या दोन्ही नायिका लग्नाच्या बाबतीत जरा मागेच राहिल्या होत्या. त्यांच्या वयाच्या इतर नायिकांची मुले पाच-पाच वर्षांची झाली असतानाही या दोघींच्या लग्नाचा मात्र काहीच पत्ता नव्हता. काल-परवा मात्र अचानकच दोघींनीही एकामागून एक लग्नाच्या बातम्या दिल्या. त्यातही विशेष गोष्ट ही की दोघींनीही जीवनसाथी म्हणून निवडलेले तरुण त्यांच्यापेक्षा वयाने नऊ ते दहा वर्ष लहान आहेत. उर्मीलाने नऊ वर्षाने लहान असणाऱ्या काश्मिरी व्यावसायिक मोहसीन अख्तर मीर याच्यासोबत लग्न केले तर प्रिटी झिंटानेही आपल्या वयाहून दहा वर्षाहून लहान असणाऱ्या जीन गुडनइफशी लग्न केले. कमी वयाच्या तरुणासोबत लग्न करणाऱ्या अशाच काही अभिनेत्रींचा हा आढावा...
प्रीती झिंटा : ४१ वर्षीय प्रिती झिंटाने आपल्याहून दहा वर्षाने लहान असणाऱ्या ३१ वर्षीय अमेरिकन जीन गुडनईफशी लॉस एंजल्स येथे विवाह केला. आपल्या आईमुळे आपण २०१६ साली लग्न करणार असल्याचे प्रितीने अगोदरच जाहीर केले होते.
ऐश्वर्या रॉय : ४२ वर्षीय ऐश्वर्या रॉयने आपल्याहून कमी वयाच्या म्हणजे ३९ वर्षीय अभिषेक बच्चनसोबत २००७ साली लग्न केले. गुरू या चित्रपटादरम्यान या दोघांमध्ये प्रेमप्रकरण सुरू झाले. सलमान खानपासून दुरावलेल्या ऐश्वर्या रॉयने अभिषेकशी लग्न केले. या दोघांना आराध्या नावाची मुलगी आहे.
शिल्पा शेट्टी : ४१ वर्षीय शिल्पा शेट्टीने आपल्यापेक्षा वयाने तीन महिने लहान असलेल्या व्यावसायिक राज कुंद्रासोबत २००९ साली लग्न केले. या दोघांना वियान नावाचा मुलगा आहे.
ऊर्मिला मातोंडकर : ४२ वर्षीय सिनेअभिनेत्री ऊर्मिला मातोंडकरने आपल्या वयाहून नऊ वर्षाने लहान असणाऱ्या ३३ वर्षीय मॉडेल मोहसीन अख्तर मीरसोबत गुरुवारी लग्न केले. मोहसीनचा गारमेंटचा व्यवसाय आहे.
डेमी मूर : ४३ वर्षीय डेमी मूरने २७ वर्षीय अ‍ॅस्टन कुचरशी २००५ साली लग्न केले. २०१३ साली त्यांच्यात घटस्फोट झाला. हे कुचरचे पहिले तर डेमी मूरचे तिसरे लग्न होते.
एलिझाबेथ टेलर
१९९१ साली ५९
वर्षीय एलिझाबेथ
टेलरने ३९ वर्षीय लॅरी फॉर्टेन्स्कीसोबत लग्न केले होते. १९९६ साली त्यांनी घटस्फोट घेतला.
फराह खान : ५१ वर्षीय नृत्य दिग्दर्शिका फराह खानने आपल्या वयापेक्षा नऊ वर्षांनी लहान असणाऱ्या शिरीष कुंदरसोबत २००४ साली लग्न केले. या दोघांना अन्या, दिव्या आणि झार ही तीन मुले आहेत.

Web Title: Many heroes married to a young boy