'एक नंबर, तुझी कंबर...' गाण्यावर थिरकला 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेता अजिंक्य राऊत, व्हिडीओला मिळतेय पसंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 11:21 IST2025-06-18T11:20:52+5:302025-06-18T11:21:16+5:30
Ajinkya Raut : 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेता अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) यालाही या गाण्यावर रिल बनवण्याचा मोह आवरला नाही. त्यानेदेखील 'एक नंबर, तुझी कंबर...' गाण्यावर डान्स केला आहे आणि त्याच्या या रिलला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

'एक नंबर, तुझी कंबर...' गाण्यावर थिरकला 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेता अजिंक्य राऊत, व्हिडीओला मिळतेय पसंती
संजू राठोड(Sanju Rathod)च्या 'एक नंबर, तुझी कंबर...' (Ek Number Tuzi Kambar) गाण्याची क्रेझ काही संपताना दिसत नाही आहे. या गाण्याने फक्त नेटकऱ्यांनाच नाही तर मराठीसह हिंदी कलाकारांनाही भुरळ घातली आहे. त्यांनी बनवलेले रिल सोशल मीडियावर व्हायरल होतानाही दिसतात. दरम्यान आता 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेता अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) यालाही या गाण्यावर रिल बनवण्याचा मोह आवरला नाही. त्यानेदेखील 'एक नंबर, तुझी कंबर...' गाण्यावर डान्स केला आहे आणि त्याच्या या रिलला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
अजिंक्य राऊत मराठी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेता आहे. ज्याने मालिका आणि सिनेमात काम केले आहे. अजिंक्य सोशल मीडियावर सक्रीय असून या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असतो. दरम्यान त्याला संजू राठोडच्या 'एक नंबर, तुझी कंबर...' या गाण्याने भुरळ घातली आहे. त्याने या गाण्यावर रिल बनवला आहे. त्याने हा व्हिडीओ शेअर करून लिहिले की, रोमँटिक वातावरण आणि मस्तीचा मूड.
त्याच्या या पोस्टवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. त्याच्या या रिलवर संजू राठोडनं कमेंट केलीय ब्रो आणि फायर इमोजी शेअर केलीय. मीरा जोशीने क्युट अशी कमेंट केलीय.
वर्कफ्रंट
अजिंक्य राऊतच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तो 'विठू माऊली' मालिकेतून घराघरात पोहोचला. 'मन उडू उडू झालं' या मालिकेतून इंद्रा म्हणून लाखो तरुणींची क्रश झालेल्या अजिंक्यने मालिकांबरोबरच चित्रपटातही काम केलं आहे. त्याने 'टकाटक २', 'सरी' असे दर्जेदार चित्रपट करून प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. शेवटचा अबोल प्रीतीची अजब कहाणी मालिका आणि राख या वेबसीरिजमध्ये काम करताना दिसला.