'जुनं फर्निचर' सिनेमाची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई, तीन दिवसांत कमावले इतके कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 04:02 PM2024-04-29T16:02:12+5:302024-04-29T16:03:21+5:30

महेश मांजरेकरांचा 'जुनं फर्निचर' बॉक्स ऑफिसवर सुसाट, तीन दिवसांची कमाई पाहा

mahesh manjarekar juna firniture marathi movie box office collection day 3 | 'जुनं फर्निचर' सिनेमाची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई, तीन दिवसांत कमावले इतके कोटी

'जुनं फर्निचर' सिनेमाची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई, तीन दिवसांत कमावले इतके कोटी

बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित 'जुनं फर्निचर' सिनेमा २६ एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित झाला. या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. महेश मांजरेकरांचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमातून एक वेगळी गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 'जुनं फर्निचर' सिनेमाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमाचे शो हाऊसफूल होत आहेत. आता या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शनही समोर आलं आहे. 

महेश मांजरेकरांचा 'जुनं फर्निचर' सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या सिनेमाने तीन दिवसांत कोट्यवधींचा गल्ला जमवला आहे. सॅकनिल्कने दिलेल्या रिपोर्टनुसार, प्रदर्शनाच्या दिवशी 'जुनं फर्निचर' सिनेमाने ४० लाखांची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये वाढ झालेली दिसून आली. वीकेंडला 'जुनं फर्निचर' सिनेमाला प्रेक्षकांनी पसंती दर्शविली. 

'जुनं फर्निचर' सिनेमाने वीकेंडला १.७९ कोटींचं कलेक्शन केलं. प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी ७७ लाख रुपयांचा गल्ला जमवला. तर दिवशी म्हणजेच रविवारी १.०२ कोटींचा बिझनेस केला. महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' सिनेमाने ३ दिवसांत २.१९ कोटी रुपयांची कमाई केली आहे. 

'जुनं फर्निचर' सिनेमातून एका वृद्ध झालेल्या वडिलांची हृदयस्पर्शी गोष्ट मांडण्यात आली आहे. स्वत:च्याच लेकाविरोधात कोर्टात जाणाऱ्या आणि इंगा दाखवत लेकाला वठणीवर आणणाऱ्या वृद्ध वडिलांभोवती या सिनेमाची कथा फिरते. या सिनेमात महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, अनुषा दांडेकर, भूषण प्रधान यांच्या मुख्य भूमिका आहेत.  

Web Title: mahesh manjarekar juna firniture marathi movie box office collection day 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.