'हा सागरी किनारा'; समुद्र किनारी पहिल्यांदाच रोमॅण्टिक झाले प्रभाकर मोरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 19:00 IST2023-04-24T18:59:55+5:302023-04-24T19:00:55+5:30

Prabhakar more: या व्हिडीओमध्ये त्यांनी पत्नीचा हात हातात घेतला आहे.

maharashtrachi hasyajatra fame prabhakar more share romantic video with wife on social media | 'हा सागरी किनारा'; समुद्र किनारी पहिल्यांदाच रोमॅण्टिक झाले प्रभाकर मोरे

'हा सागरी किनारा'; समुद्र किनारी पहिल्यांदाच रोमॅण्टिक झाले प्रभाकर मोरे

कोकणी शैलीत चपखल विनोद करत प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा अभिनेता म्हणजे प्रभाकर मोरे (prabhakar more). आपल्या अभिनयातून, विनोदातून प्रभाकर मोरे कायमच त्यांची कोकणी संस्कृती जपण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांची कायम चर्चा होत असते. यामध्येच पहिल्यांदाच त्यांचा रोमॅण्टिक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

प्रभाकर मोरे कलाविश्वासह सोशल मीडियावरही सक्रीय आहे. त्यामुळे वरचेवर ते चाहत्यांच्या भेटीला येत असतात. यात अलिकडेच त्यांनी त्यांच्या पत्नीसोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते पत्नीसोबत दिसत असून ही जोडी समुद्र किनारी फेरफटका मारत आहे. यावेळी त्यांनी पत्नीचा हात हातात घेतला आहे आणि तिच्याशी गप्पा मारत आहेत. विशेष म्हणजे या पती-पत्नीमधील प्रेम पाहून चाहत्यांनादेखील आनंद झाला आहे.

दरम्यान, प्रभाकर मोरे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता असून आपल्या विनोदी शैलीने त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. इतकंच नाही तर त्यांचं शालू हे गाणंदेखील सुपरहिट आहे.
 

Web Title: maharashtrachi hasyajatra fame prabhakar more share romantic video with wife on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.