Lokmat Most Stylish Award 2021: अभिनेत्री हृता दुर्गुळे ठरली लोकमत मोस्ट स्टायलिश टेलिव्हिजन ॲक्ट्रेस पुरस्काराची मानकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 09:54 PM2021-12-02T21:54:09+5:302021-12-02T21:54:36+5:30

आपल्या सौंदर्याने आणि अभिनय कौशल्याने लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळेने तमाम प्रेक्षकांच्या मनाला भुरळ पाडली आहे. 

Lokmat Most Stylish Award 2021: Actress Hruta Durgule wins Most Stylish Television Actress Award | Lokmat Most Stylish Award 2021: अभिनेत्री हृता दुर्गुळे ठरली लोकमत मोस्ट स्टायलिश टेलिव्हिजन ॲक्ट्रेस पुरस्काराची मानकरी

Lokmat Most Stylish Award 2021: अभिनेत्री हृता दुर्गुळे ठरली लोकमत मोस्ट स्टायलिश टेलिव्हिजन ॲक्ट्रेस पुरस्काराची मानकरी

googlenewsNext

मुंबई - बॉलीवूडसह विविध क्षेत्रांमधील स्टायलिश व्यक्तींचा सन्मान दरवर्षी लोकमतकडून करण्यात येतो. लोकमतच्या स्टाईल सोहळ्यात मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी तसेच टीव्ही जगतातील कलाकारांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं. मराठी मालिका क्षेत्रात तरुणाईच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री हृता दुर्गुळे(Hruta Durgule)  हिला लोकमत मोस्ट स्टायलिश टेलिव्हिजन ॲक्ट्रेस या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.

आजवर आपण अनेक पुरस्कार सोहळे पाहिले असतील मात्र लोकमतच्या वतीने आयोजित हा सोहळा थोडा हटके आणि खास असतो. पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टीतील तारे-तारकांसह उद्योग, प्रशासन, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांना त्यांच्या स्टाइलसाठी सन्मानित करण्यात आले. अभिनेत्रींचा ग्लॅमरस अंदाज हा नेहमीच प्रेक्षकांना भुरळ घालतो. एखादी व्यक्ती नेहमी ग्लॅमरस आणि स्टायलिश लूकमध्ये दिसली की तिची छबी तयार होते पण तिच व्यक्ती जर सिंपल आणि सोबर लूकमध्ये दिसली की तितकाच निरागसपणा किंवा सिंपलिसिटी त्या व्यक्तीमध्ये दिसून येते आणि त्यामुळे प्रेक्षकांवर त्याची जास्त भुरळ पडते. असंच काहीसं आहे हृता दुर्गुळेबद्दल.

आपल्या सौंदर्याने आणि अभिनय कौशल्याने लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळेने तमाम प्रेक्षकांच्या मनाला भुरळ पाडली आहे.  प्रत्येक अदा जितकी रसिकांना घायाळ करणारी असते तितकीच तिची स्टाईलही खास असते. ती तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. ‘फुलपाखरू’ या मालिकेनंतर हृता‘मन उडू उडू झालं’ मालिकेत ती झळकत आहे. आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार सोहळ्यात ग्लॅमरस हृताचा स्टायलिश लूक, सौंदर्याने चारचाँद लावले. आकर्षक ड्रेस यामुळे हृताच्या फॅशन सेन्सची कायमच चर्चा असते. त्यामुळेच की काय या स्टाईल सेन्सचा या या दिमाखदार सोहळ्यात मोस्ट स्टायलिश टीव्ही अॅक्ट्रेस हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. या सोहळ्यात पुन्हा एकदा  ब्युटीफुल अंदाजात तिने हजेरी लावली होती. ग्लॅमसरस अंदाज या सोहळ्यात पाहायला मिळाला. त्याचसोबत विशेष आकर्षण ठरलं ते म्हणजे ऋता ही तिचा बॉयफ्रेंड प्रतिक शाहसोबत या सोहळ्याला हजेरी लावली होती.

Web Title: Lokmat Most Stylish Award 2021: Actress Hruta Durgule wins Most Stylish Television Actress Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.