मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘अ डॉट कॉम मॉम’चे गाणे लाँच

By Admin | Updated: September 22, 2016 02:51 IST2016-09-22T02:51:42+5:302016-09-22T02:51:42+5:30

जगात सगळ्यात महत्त्वाचं आणि सुंदर नातं मानलं जात ते आई आणि मुलाचं

Launch of 'A dot com mom' song at the hands of Chief Minister | मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘अ डॉट कॉम मॉम’चे गाणे लाँच

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘अ डॉट कॉम मॉम’चे गाणे लाँच


जगात सगळ्यात महत्त्वाचं आणि सुंदर नातं मानलं जात ते आई आणि मुलाचं. या नात्यामध्ये कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नसतो. असतो तो फक्त भावनिक बंध. मुलाची प्रत्येक चूक पोटात घालून मायेनं जवळ करणारी ती आईच असते. आई मुलाच्या या भावनिक बंधाची गोष्ट सांगणारा ‘अ डॉट कॉम मॉम’ हा चित्रपट 30 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटातील गाण्यांचा आॅडियो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लाँच करण्यात आला. या वेळी पालकमंत्री दीपक केसरकर, दिग्दर्शिका डॉ. मीना नेरूरकर आणि अभिनेता साई गुंडेवार उपस्थित होते. या चित्रपटाची निर्माता, दिग्दर्शक, संवाद लेखन, गीतकार आणि कोरिओग्राफी अशा अनेक भूमिका डॉ. मीना नेरूरकर यांनी पार पाडल्या आहेत. तसेच,
‘अ डॉट कॉम मॉम’च्या भूमिकेत त्या स्वत: दिसणार आहेत.

Web Title: Launch of 'A dot com mom' song at the hands of Chief Minister