कॅन्सरशी झुंज, आईचं निधन अन्...; 'त्या' कठीण काळाबद्दल बोलताना अभिनेत्री झाली भावुक, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 13:11 IST2025-11-19T12:54:39+5:302025-11-19T13:11:39+5:30
"मला कॅन्सर आहे हे समजल्यावर हलले, पण...", 'लग्नानंतर होईल प्रेम' फेम अभिनेत्रीने सांगितला आजारपणाचा 'तो' वाईट अनुभव

कॅन्सरशी झुंज, आईचं निधन अन्...; 'त्या' कठीण काळाबद्दल बोलताना अभिनेत्री झाली भावुक, म्हणाली...
Marathi Actress Sanyogeeta Bhave: 'लग्नानंतर होईलच प्रेम' ही स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेत मृणाल दुसानिस, विवेक सांगळे, ज्ञानदा रामतीर्थकर आणि विजय आंदळकर या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. तर अभिनेत्री संयोगिता भावे यांनी वसू आत्या ही खलनायिकेची भूमिका साकारली आहे. सध्या ही अभिनेत्री एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. या मुलाखतीत संयोगिता यांनी त्यांच्या आजारपणाबद्दल पहिल्यांदाच खुलासा केला आहे.
अलिकडेच अभिनेत्री संयोगिता भावे यांनी 'मज्जा पिंक'ला मुलाखत दिली. यावेळी संयोगिता यांनी त्यांच्या आजारपणाबद्दल खुलासा केला. जवळपास ५ वर्षांपूर्वी संयोगिता यांना कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यावेळी आपल्याला कॅन्सर झाल्याचं कळताच तेव्हा काय रिअॅक्शन होती आणि या सगळ्याचा सामना कसा केला. असा प्रश्न त्यांना मुलाखतीत विचारण्यात आला. त्या कठीण काळाबद्दल बोलताना संयोगिता म्हणाल्या,"कॅन्सरबद्दल कळताच मी थोडी हलले होते. पण, एक गोष्ट सांगायची तर तेव्हा माझ्या मनामध्ये हा प्रश्न नाही आला की हा आजार मलाच का झाला. मी काय केलं. हे माझ्या डोक्यामध्ये नाही आलं. थोडी हलले होते.
मग त्यांनी सांगितलं,"पण, आज यावर आपल्याकडे खूप ट्रिटमेन्ट्स आहेत. म्हणजे मेडिकल सायन्सही आपलं खूप पुढे गेलं आहे. शिवाय या आजावर अनेक औषधोपटचार उपलब्ध आहेत. "
आईबद्दल बोलताना अभिनेत्री झाल्या भावुक...
एकीकडे सगळं सुरळीत सुरु असताना संयोगिता यांच्या आईचं कॅन्सरने निधन झालं. त्यामुळे त्या पूर्णपणे खचल्या होत्या. त्या म्हणाल्या, "माझ्या आईचं कॅन्सरमुळे निधन झालं. पहिल्यांदा कॅन्सर आणि नंतर लिम्फोमा झाला. ही खूप वाईट गोष्ट घडली. कारण, ती माझा एकमेव सपोर्ट होती. ती आपल्या आयुष्यात नाही आणि आपल्याला या आजारपणाला सामोरं जावं लागतंय, असं वाटत होतं. पण, ते कुठेतरी तेव्हा वाटलं की ती माझ्या पाठीशी आहे. तो जो आपल्या आतला आवाज कायम आत्मविश्वास देत असतो." असा भावुक प्रसंग अभिनेत्रीने यादरम्यान शेअर केला.