करिनाचा लेडिज स्पेशल चित्रपट

By Admin | Updated: June 21, 2016 18:55 IST2016-06-21T18:36:32+5:302016-06-21T18:55:06+5:30

अभिनेत्री करिना कपूरला सैफ अली खानशी लग्न केल्यानंतर बहुधा अच्छे दिन आल्याची प्रचिती येत असावी.

Ladies Special Film of Kareena | करिनाचा लेडिज स्पेशल चित्रपट

करिनाचा लेडिज स्पेशल चित्रपट

style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 21- अभिनेत्री करिना कपूरला सैफ अली खानशी लग्न केल्यानंतर बहुधा अच्छे दिन आल्याची प्रचिती येत असावी. बॉलिवूडमध्ये बबली गर्ल म्हणून फेमस असलेली करिना कपूर बजरंगी भाईजान आणि उडता पंजाबमधल्या भूमिकेनंतर आता 'वीरे दी वेडिंग' या चित्रपटात अनोखी भूमिका साकारण्यास सज्ज झाली आहे. या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे यात फक्त मुलीच काम करणार आहेत. या चित्रपटाचं कथानक पूर्णतः मुलींवर आधारित आहे, असं वृत्त इंडियन एक्स्प्रेसनं दिलं आहे.  
"भारतातला हा सर्वात पहिला मुलींसाठीचा चित्रपट आहे. चार मैत्रिणी माझ्या लग्नात एकत्र येतात आणि मजामस्ती करतात, हे ख-या अर्थानं रोमांचक आणि मजेशीर आहे. अशा थाटणीचा चित्रपट याआधी कोणी बनवला नाही", असं वक्तव्य अभिनेत्री करिना कपूर हिनं केलं आहे.  आजच्या काळात असे चित्रपट बनवणं खूप सोपं असल्याचंही करिना कपूरनं म्हटलं आहे.
'वीरे दी वेडिंग' चित्रपटात करिना कपूरसोबत सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तल्सानिया काम करणार आहेत. या चित्रपटाच्या रिया कपूर आणि एकता कपूर निर्मात्या आहेत. हा एक अद्भुत चित्रपट असून, लोकांना तो नक्कीच आवडेल, अशी आशा करिना कपूरनं व्यक्त केली आहे. 

 

 

Web Title: Ladies Special Film of Kareena