क्षितीने बनवले दिवाळीसाठी लाडू

By Admin | Updated: October 31, 2016 02:21 IST2016-10-31T02:21:46+5:302016-10-31T02:21:46+5:30

प्रत्येकाला सेलिब्रिटींच्या आयुष्यातील घडणाऱ्या गोष्टी ऐकण्यात रस असतो.

Laddo made by accidentally created for Diwali | क्षितीने बनवले दिवाळीसाठी लाडू

क्षितीने बनवले दिवाळीसाठी लाडू


मुंबई- प्रत्येकाला सेलिब्रिटींच्या आयुष्यातील घडणाऱ्या गोष्टी ऐकण्यात रस असतो. कलाकार काय करतात, कुठे असतात, कसे राहतात, असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या डोक्यात येत असतात. पण प्रेक्षकांच्या या प्रश्नाचे उत्तर अभिनेत्री क्षिती जोग हिने दिले आहे. नुकतेच क्षितीने स्वत: लाडू तयार करतानाचे काही फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. हे लाडू करताना फार मजा आली असल्याचेदेखील तिने सोशल मीडियावर सांगितले आहे. क्षितीचे लाडू बनवतानाचे फोटो पाहिल्यावर तिच्या चाहत्यांनी तिचे सोशल मीडियावर कौतुक केले आहे. तसेच क्षिती तुझ्या हातचे लाडू आम्हालाही खायला आवडतील, असे मजेशीर कमेंटदेखील केल्या आहेत. क्षितीची दामिनी आणि वादळवाट या मालिकेतील भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. तसेच तिने ये रिश्ता क्या कहलाता है, साराबाई वर्सेस साराबाई अशा हिंदी मालिकेतूनदेखील आपल्या अभिनयाची छबी उमटविली आहे.

Web Title: Laddo made by accidentally created for Diwali