केआरके पुन्हा बरळला...

By Admin | Updated: May 31, 2017 05:10 IST2017-05-31T05:10:47+5:302017-05-31T05:10:47+5:30

स्व त:ला देशातील सर्वांत मोठा क्रिटिक समजणारा केआरके ऊर्फ कमाल खान हा स्वत:हून वादाला निमंत्रण देण्यास माहीर आहे. आपल्या वाचाळ

KRK recaptured ... | केआरके पुन्हा बरळला...

केआरके पुन्हा बरळला...

स्व त:ला देशातील सर्वांत मोठा क्रिटिक समजणारा केआरके ऊर्फ कमाल खान हा स्वत:हून वादाला निमंत्रण देण्यास माहीर आहे. आपल्या वाचाळ वाणीने आणि वादग्रस्त ट्विटने तो दररोज कोणावर तरी निशाणा साधत असतो. कालच केआरकेने सचिनच्या डॉक्यूड्रामा ‘सचिन : अ बिलियन ड्रीम्स’ या चित्रपटाविषयी ट्विट करून ‘उथळ चित्रपट’ असे म्हटले होते. त्यामुळे केआरकेवर सचिनच्या चाहत्यांनी चांगलीच तोफ डागली होती. आता पुन्हा एकदा केआरके एका वेगळ्या वादग्रस्त ट्विटमुळे चर्चेत आला आहे. यावेळी त्याने अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिच्यावर निशाणा साधला आहे. ट्विंकल अक्षय कुमारच्या आगामी ‘पॅडमॅन’ या चित्रपटाची निर्माता आहे. चित्रपट अरुणाचलम मुरुगनाथम यांच्या जीवनावर आधारित आहे. अरुणाचलम यांनी देशात सॅनेटरी नॅपकीन बनविण्याचे सर्वांत स्वस्त साधन शोधून काढले होते. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठीच ट्विंकल सध्या महिलांमध्ये पीरियड्सविषयी जनजागृती करीत आहे. तिने ट्विट करताना लिहिले की, ‘मेन्स्ट्रुएशनवर बोलण्यास लाज वाटायला नको.’ याच ट्विटवर केआरकेने निशाणा साधताना ट्विट केले की, ‘ट्विंकल खन्ना लोकांना मेन्स्ट्रुएशनवर चर्चा करण्याचा सल्ला देत आहे. ये भाभीजी पुरी पागल हो चुकी है। कोई इन्हें अस्पताल में भर्ती कराओ’ असे लिहिले आहे.

Web Title: KRK recaptured ...