घटस्फोटानंतर कीर्ती कुल्हारी पुन्हा प्रेमात? म्हणाली " हो, गेल्या तीन-चार महिन्यांपासून..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 15:41 IST2025-11-16T14:30:34+5:302025-11-16T15:41:34+5:30
किर्ती कुल्हारी कुणाला डेट करतेय? नाव वाचून व्हाल चकित

घटस्फोटानंतर कीर्ती कुल्हारी पुन्हा प्रेमात? म्हणाली " हो, गेल्या तीन-चार महिन्यांपासून..."
किर्ती कुल्हारी बॉलिवूड सिनेसृष्टीतील एक अष्टपैलू अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिच्याबद्दल प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुक असतात. अशातच किर्ती कुल्हारीने तिच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. अलीकडेच तिने तिच्या खासगी आयुष्याबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.
चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तिने प्रियांका सिंगसोबत संवाद साधला.
अलीकडेच तिने एका मुलाखतीत तिच्या आयुष्यात एका खास व्यक्तीची एन्ट्री झाल्याचे संकेत दिले आहेत, ज्यामुळे ती लवकरच दुसरे लग्न करणार असल्याची चर्चा सिनेसृष्टीत रंगली आहे. किर्ती कुल्हारी तिच्या आगामी 'फुल प्लेट' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यावेळी "आयुष्य कधी 'फुल प्लेट'सारखं वाटतं?" या प्रश्नावर उत्तर देताना कीर्ती म्हणाली, "सध्या, माझी प्लेट कामाने अक्षरशः भरलेली आहे. यावर्षीचा हा माझा तिसरा चित्रपट आहे. नुकतंच मी 'फोर मोअर शॉट्स प्लीज!' च्या चौथ्या सीझनचे शूटिंग पूर्ण केले आहे आणि केरळमधील एका चित्रपटाचे ५० दिवसांचे शूटिंग करून परतले आहे".
आयुष्यातील इतर गोष्टींबद्दल बोलताना ती म्हणाली, "माझ्या घरी दोन कुत्रे आहेत आणि ते माझे आयुष्य भरलेले ठेवतात. मला घरचे शिजवलेले जेवण मिळत आहे आणि माझे आरोग्य चांगले आहे". यावेळी अभिनत्रीनं ती पुन्हा लग्न करणार असल्याचे संकेत दिलेत. कीर्ती म्हणाली, "या सगळ्याशिवाय, तुम्हाला एका चांगल्या सोबत्याची आवश्यकता असते. आणि हो, गेल्या तीन-चार महिन्यांपासून, माझ्या आयुष्यातही तेच आहे". कीर्तीच्या या खुलाशामुळे ती पुन्हा एकदा प्रेमात पडल्याची किंवा लवकरच दुसऱ्यांदा लग्न करणार असल्याची चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे. ती राजीव सिद्धार्थला डेट करत असल्याचं बोललं जात आहे.
अवघ्या पाच वर्षांत झाला होता कीर्ती कुल्हारीचा घटस्फोट
किर्तीने तिच्या करिअरपासून वैयक्तिक आयुष्यापर्यंत खूप संघर्ष पाहिला आहे. कीर्ती कुल्हारी ही मूळची राजस्थानच्या झुंझुनूची आहे. एका जाहिरातीत काम करताना कीर्ती आणि साहिल यांची भेट झाली. यानंतर त्यांचे नाते सुरू झाले. काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर कीर्तीने साहिलला लग्नासाठी प्रपोज केलं. २०१६ मध्ये दोघांनी लग्न केले. पण, त्यांचं नात जास्त काळ टिकलं नाही. अभिनेत्रीने २०२१ च्या सुरुवातीला तिचा पती साहिल सहगलपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता.