केजरीवाल यांनी वजीर टीमसोबत पाहिला चित्रपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2016 18:01 IST2016-01-06T17:58:02+5:302016-01-06T18:01:44+5:30

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी वजीर हा चित्रपट पाहिला. विशेष म्हणजे अरविंद केजरीवाल वजीरच्या टीम अभिनेता फरहान अख्तर, अदिती राव हैदरी, बिजॉय

Kejriwal watched the film with the Wazir | केजरीवाल यांनी वजीर टीमसोबत पाहिला चित्रपट

केजरीवाल यांनी वजीर टीमसोबत पाहिला चित्रपट

>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ६ - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी वजीर हा चित्रपट पाहिला.  विशेष म्हणजे अरविंद केजरीवाल वजीरच्या टीम अभिनेता फरहान अख्तर, अदिती राव हैदरी, बिजॉय नामबैर आणि विधु विनोद चोप्रा यांच्यासोबत बघितला. 
दिल्लीतील पीव्हीआर डायरेक्टर्स कटमध्ये मंगऴवारी वजीर या चित्रपटाचे विशेष आयोजन करण्यात आले होते. यावेळी केजरीवाल यांनी वजीरच्या टीमसोबत हा चित्रपट पाहिला. 
या चित्रपटामध्ये फरहानने दानिश अली हा एटीएस अधिकारी साकारला असून, अमिताभ बच्चन यांचीही मुख्य भूमिका आहे. फरहान आणि अमिताभ दोघे मित्र दाखवले आहेत. एटीएस अधिका-याच्या कर्तव्याइतकचं त्याच व्यक्तीगत आयुष्य या चित्रपटातून मांडण्यात आले आहे. तसेच, अमिताभ बच्चन ग्रॅंडमास्टरची भूमिका साकारली आहे.
वजीरमध्ये अभिनेता फरहान अख्तर, अमिताभ बच्चन, अदिती राव हैदरी यांच्यासोबतच नील नितीन मुकेश आणि जॉन अब्राहम यांचाही समावेश आहे. हा चित्रपट येत्या ७ जानेवारील सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: Kejriwal watched the film with the Wazir