Riteish Deshmukh आणि Genelia D'Souza यांना अमिताभ बच्चन यांच्यासमोर कोसळलं रडू; 'हे' आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 14:49 IST2021-10-07T14:47:58+5:302021-10-07T14:49:24+5:30
पाहा काय आहे कारण?

Riteish Deshmukh आणि Genelia D'Souza यांना अमिताभ बच्चन यांच्यासमोर कोसळलं रडू; 'हे' आहे कारण
कौन बनेगा करोडपती १३ (Kaun Banega Crorepati 13) हा सर्वाचा आवडत्या शो पैकी एक आहे. सध्या शुक्रवारच्य़ा एका भागाचा प्रोमो दाखवला जात आहे. यामध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जेनेलिया डिसूजा (Genelia D'Souza) यांचं स्वागत केलं. कॅन्सरग्रस्त मुलांच्या उपचारासाठी मदत म्हणून पैसे जमवण्यासाठी त्यांनी या शोमध्ये भाग घेतला होता.
प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन यांनी या स्टार कपलचं स्वागत केलं. यावेळी कर्करोगानं ग्रस्त असलेल्या मुलांची एक क्लिप दाखवण्यात आली. या प्रोमोमध्ये मुलांच्या प्रतिक्रिया ऐकून सर्वांचेच डोळे पाणावले. यावेळी त्यांच्याकडे पाहून जेनेलियादेखील स्वत:चे अश्रू रोखू शकली नाही. बिग बी अमिताभ बच्चन आणि रितेश देशमुखही ती क्लिप पाहून सून्न झाले. मुलांवर काय परिस्थिती ओढावली आहे हे आपण कधीच समजू शकणार नाही, असंही रितेश यात बोलताना दिसतोय.
बिग बीं नी केलं दोघांचं कौतुक
समजात बदल घडवण्यासाठी दोघांनी केलेल्या प्रयत्नांचं अमिताभ यांनी यावेळी कौतुक करत त्यांचे आभारही व्यक्त केले. इमोशनल बाबींशिवाय केबीसीचा हा एपिसोड रितेश आणि जेनेलियाच्या अनेक किस्स्यांनीही भरलेला आहे. या एपिसोडमध्ये रितेश जेनेलिया समोर बसून बिग बी यांचा डायलॉग आपल्या अंदाजातही म्हणताना दिसणार आहे.