KBC: १२ लाख ५० हजारांच्या प्रश्नावर क्विट केला खेळ, काय होतं उत्तर तुम्ही करा गेस....

By अमित इंगोले | Published: October 31, 2020 09:21 AM2020-10-31T09:21:33+5:302020-10-31T09:23:40+5:30

कौन बनेगा करोडपतीमध्ये ६ लाख ४० हजार रूपये इतकी रक्कम जिंकली. शिवानी यांनी १२ लाख ५० हजार रूपयांच्या प्रश्नावर शो क्विट केला.

KBC 12 : Shivani Sankpal quit the game on this question | KBC: १२ लाख ५० हजारांच्या प्रश्नावर क्विट केला खेळ, काय होतं उत्तर तुम्ही करा गेस....

KBC: १२ लाख ५० हजारांच्या प्रश्नावर क्विट केला खेळ, काय होतं उत्तर तुम्ही करा गेस....

googlenewsNext

'कौन बनेगा करोडपती' सीझन १२ च्या शुक्रवारच्या एपिसोडमध्ये हॉटसीटवर गुरूवारच्या स्पर्धक शिवानी संकपाल होत्या. शिवानी व्यवसायाने क्रेन डिझायनर आहे. त्यांनी कौन बनेगा करोडपतीमध्ये ६ लाख ४० हजार रूपये इतकी रक्कम जिंकली. शिवानी यांनी १२ लाख ५० हजार रूपयांच्या प्रश्नावर शो क्विट केला.

१२ लाख ५० हजार रूपयांच्या प्रश्नापर्यंत पोहोचेपर्यंत शिवानी यांनी आपल्या सर्व लाइफलाईन गमावल्या होत्या. शिवानीला जेव्हा १२.५० लाख रूपयांचा प्रश्न विचारण्यात आला होता की,  यातील कोणते राष्ट्रपती भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे अध्यक्ष नव्हते? या प्रश्नाच्या उत्तराचे अमिताभ बच्चन यांनी शिवानीला चार पर्याय दिले होते. (KBC : 'या' १४ प्रश्नांची उत्तरे देत १ कोटीपर्यंत पोहोचल्या होत्या छवि, १५व्या प्रश्नावर अडकल्या आणि...)

A. शंकर दयाल शर्मा

B. नीलम संजीव रेड्डी

C. राजेंद्र प्रसाद

D. सर्वपल्ली राधाकृष्णन

या प्रश्नाच्या उत्तराबाबत शिवानी यांना अजिबात काही आयडीया नव्हती. त्यांनी बराच वेळ या प्रश्नाच्या उत्तराचा विचार केला. शिवानी या सतत ऑप्शन ए म्हणजे शंकर दयाल शर्मा हेच उत्तर गेस करत होत्या. पण उत्तराबाबत त्या निश्चित नव्हत्या. अखेर त्यांनी खेळ क्विट करण्याचा निर्णय घेतला. (KBC मध्ये २५ लाखांच्या प्रश्नावर स्पर्धकाने सोडला खेळ, जाणून घ्या काय होता प्रश्न आणि त्याचं उत्तर....)

खेळ क्विट करण्याआधी शिवानी यांनी ऑप्शन ए लॉक करण्यासाठी सांगितलं. जेणेकरून योग्य उत्तर लोकांना कळावं. मात्र, अमिताभ बच्चन यांनी हे उत्तर चुकीचं असल्याचं सांगितलं. बरोबर उत्तर ऑप्शन डी म्हणजे सर्वपल्ली राधाकृष्णन हे आहे. 
 

Web Title: KBC 12 : Shivani Sankpal quit the game on this question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.