'काव्यांजली' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, अभिनेत्रीने शेअर केली पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 11:52 AM2024-05-27T11:52:08+5:302024-05-27T11:52:29+5:30

कलर्स मराठी वाहिनीवरील काव्यांजली मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. या मालिकेतील अभिनेत्री कश्मीरा कुलकर्णी हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

'Kavyanjali' serial farewell to the audience, the actress shared a post | 'काव्यांजली' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, अभिनेत्रीने शेअर केली पोस्ट

'काव्यांजली' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, अभिनेत्रीने शेअर केली पोस्ट

छोट्या पडद्यावर सध्या नवीन मालिका दाखल होत आहे. तर काही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. कलर्स मराठी वाहिनीवरील एक मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. ही मालिका म्हणजे काव्यांजली. या मालिकेतील अभिनेत्री कश्मीरा कुलकर्णी हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

अभिनेत्री कश्मीरा कुलकर्णीने काव्यांजली मालिकेच्या सेटवरील फोटो शेअर केले आहेत आणि लिहिले की, बस अब हमें विदा करो जी.... आज इतके तुमचे मेसेजेस वाचून मन भरून आले आहे, पहिल्यांदाच प्रेक्षकांकडून मालिका बंद होताना इतके भावनिक होत असल्याचे समोरून कळवले जात आहे. खरंच तुम्ही खूप प्रेम दिलेत आणि काव्यांजली या मालिकेला नेहमीच उचलून धरलं या मालिकेमधल्या प्रत्येक कलाकारावर तुम्ही जो विश्वास दाखवला. त्याबद्दल आम्ही सर्वजण तुमचे ऋणी राहू.

ती पुढे म्हणाली की, पहिल्या दिवसापासूनच आम्ही म्हणत आलो आहोत की ही मालिका म्हणजे अगदी तुमच्या घरातल्या नात्यांबद्दल आणि रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांवर आहे. दोन बहिणीच्या आयुष्यावर आहे आणि तुम्ही तशीच ती घेतली कदाचित म्हणूनच इतके छान भावनिक नाते आपल्यामध्ये जुळले आहे... पण खरंच हे सगळं फक्त आणि फक्त तुमच्यामुळे शक्य झालं आहे तुम्ही आनंदाने प्रेमाने बघत असता म्हणून आम्हाला रोज नव्याने काम करण्याचा हुरूप येतो असेच तुमचे प्रेम निरंतर राहू दे पुन्हा एकदा धन्यवाद.
 

Web Title: 'Kavyanjali' serial farewell to the audience, the actress shared a post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.