कॅटरिना बनली कॅटरिना कैफ कपूर??
By Admin | Updated: September 26, 2016 10:21 IST2016-09-26T09:11:33+5:302016-09-26T10:21:42+5:30
प्रसिद्ध गायक ख्रिस मार्टिनने कॅटरिना कैफच्या नावाचा उच्चार कॅटरिना कैफ-कपूर असा केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या.

कॅटरिना बनली कॅटरिना कैफ कपूर??
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क / मुंबई, दि. २६ - बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या ब्रेकअपमुळे त्यांच्या चाहत्यांना खूप दु:ख झाले. सहा वर्षांपासून एकत्र असलेलं हे दोघे अखेर गेल्या वर्षी वेगळे झाल्याची बातमी सर्वांसाठीच धक्कादायक होती. या दोघांचे लग्न होऊन कॅटरिना मिसेस.कपूर बनेल ही चाहत्यांची आशा अखेर निष्फळ ठरली. मात्र नुकतेच एका कलाकाराने कॅटरिनाचे नाव घेताना ' कॅटरिना कैफ कपूर' असा उच्चार केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या.
प्रसिद्ध गायक ख्रिस मार्टिन याने न्यूयॉर्कमधील भाषणादरम्यान कॅटरिनाच्या नावाचा उच्चार ' कॅटरिना कैफ कपूर' असा केल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटलं. मात्र तो उच्चार चुकून झाल्याचे लक्षात येताच ख्रिस मार्टिनने त्याची चूक सुधारली. न्यूयॉर्कमधील एका कार्यक्रमादरम्यान चाहत्यांशी बोलताना ख्रिस मार्टिनने त्यांना '२०१६ ग्लोबल इंडियन फेस्टिव्हल'ची माहिती दिली. त्यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि खासदार पूनम महाजन याही उपस्थित होत्या. कार्यक्रमाबद्दल बोलता बोलता ख्रिसने या कार्यक्रमात सहभागी होणा-या कलाकारांचीही माहिती दिली. ' आमिर खान, अमिताभ बच्चन, कॅटरिना कैफ , करिना कपूर, फरहान अख्तर आणि प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रेहमान ' असे अनेक दिग्गज त्यात सहभागी होणार आहेत. मात्र कॅटरिना व करिना यांची नावे एकामागोमाग असल्याने ख्रिसने कॅटरिनाच्या नावाचा उच्चार ' कॅटरिना कैफ कपूर' असा केला. अभिनेत्री प्रियांका चोप्राला त्याची चूक लक्षात येताच तिने त्याला त्याची जाणीव करून दिली. रणबीर आणि कॅटरिना वेगळ झाले असले तरी थोड्या काळासाठी का होईन कॅटरिनाच्या नावामागे 'कपूर' आडनाव लागल्याने तिच्या चाहत्यांना नक्कीच आनंद झाला असेल..!