कतरिनाला लगीनघाई?

By Admin | Updated: June 15, 2016 02:59 IST2016-06-15T02:59:44+5:302016-06-15T02:59:44+5:30

गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडमध्ये ब्रेकअपच्या बातम्या येत आहेत. अर्थात याचदरम्यान काही जणांच्या लग्नाच्या गोड बातम्याही आल्याच. एका लोकप्रिय मॅगझीनने दिलेल्या

Katrina is hanging? | कतरिनाला लगीनघाई?

कतरिनाला लगीनघाई?

गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडमध्ये ब्रेकअपच्या बातम्या येत आहेत. अर्थात याचदरम्यान काही जणांच्या लग्नाच्या गोड बातम्याही आल्याच. एका लोकप्रिय मॅगझीनने दिलेल्या वृत्तानुसार, रणबीरसोबतच्या ब्रेकअपनंतर हळूहळू सावरत असलेली कतरिना कैफ हीसुद्धा लग्नाच्या तयारीत आहे. होय, लग्न करण्याचा निर्णय कतरिनाने घेतलाय म्हणे. रणबीरसोबतच्या ब्रेकअपनंतर कतरिना सावरलेली दिसतेय. पण कॅटच्या मॉमला मात्र कतरिनाने आता भविष्याचा विचार करावा, असे प्रकर्षाने वाटू लागले आहे. त्यामुळेच तिने कतरिनासाठी वर संशोधन सुरू केले आहे. कतरिनास लवकर एक अनुरूप जोडीदार मिळावा, असे मॉमला वाटतेय आणि त्यांनी ते मनावरही घेतले आहे. म्हणजे कॅटच्या घरी लवकरच वेडिंग बेल वाजणार. आता रणबीर यावर काय बोलतो, ते ऐकणे इंटरेस्टिंग ठरेल.

Web Title: Katrina is hanging?