Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 19:07 IST2025-05-01T19:06:53+5:302025-05-01T19:07:31+5:30

Waves Summit 2025: मुंबईत आयोजित या परिषदेवेळी कार्तिक आर्यनची मोदींसमोर उडाली भंबेरी

kartik aryan felt nervous in front of Pm narendra modi at waves summit 2025 in mumbai | Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस

Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस

Waves Summit 2025: भारताच्या पहिल्या ‘जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन’ (वेव्हज) शिखर परिषदेचं आयोजन आज मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ही परिषद सुरु झाली. यावेळी पंतप्रधानांनी सर्वांना संबोधित केलं. या परिषदेसाठी भारतीय सिनेसृष्टीतील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. रजनीकांत, करण जोहर, मोहनलाल, चिरंजीवी, रणबीर कपूर, आलिया भट, हेमा मालिनी, दीपिका पदुकोणसह अनेक तारे तारकांचा सहभाग होता. यावेळी अभिनेता कार्तिक आर्यनने (Kartik Aryan) दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे.

कार्तिकने मागितली पंतप्रधान मोदींची माफी

Waves Summit मध्ये कार्तिक आर्यन म्हणाला, "मी आज इथे उपस्थित मुख्य अतिथींचं स्वागत करतो. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार तसंच इतर सर्व पाहुण्यांचं वेव्ह्ज २०२५ मध्ये हार्दिक स्वागत. मोदीजी, माफ करा पण माझी हार्टबीट खूप वाढली आहे कारण मी पहिल्यांदाच तुमच्यासमोर बोलत आहे. इथला डेकोरम मेंटेन करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. थोडीफार चूक झाली तर माफ कराल."

Waves summit चा पहिला दिवस

दरम्यान या वेव्ह्ज समिटमध्ये सुरुवातीला शाहरुख खानने सर्व पाहुण्यांचं स्वागत केलं. नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वांना प्रोत्साहन दिलं. दुसरीकडे अक्षय कुमारने चिरंजीवी आणि मोहनलाल या दिग्गज अभिनेत्यांशी स्टेजवर संवाद साधला. तसंच करण जोहरने शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणसोबत सिनेसृष्टीतील आऊटसायडर्स या विषयावर मनमोकळा संवाद साधला. एकंदर परिषदेचा पहिला दिवस अतिशय उत्साहात पार पडला. आजपासून ४ मे पर्यंत ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. मनोरंजनविश्वातील अनेक दिग्गजांना ऐकण्याची संधी यातून मिळणार आहे.

Web Title: kartik aryan felt nervous in front of Pm narendra modi at waves summit 2025 in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.