करिश्मा कपूरनं मुंबईतील १ फ्लॅट भाड्याने दिला; दर महिन्याला किती होणार कमाई? वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 16:09 IST2025-11-21T16:08:49+5:302025-11-21T16:09:47+5:30
या करारासाठी १७,१०० रूपये स्टॅम्प ड्युटी आणि १,००० रूपये नोंदणी शुल्क भरण्यात आले. त्याशिवाय २० लाख रूपये सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून घेण्यात आले आहे.

करिश्मा कपूरनं मुंबईतील १ फ्लॅट भाड्याने दिला; दर महिन्याला किती होणार कमाई? वाचा
मुंबई - बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूरनेमुंबईतील उच्चभ्रू वस्ती वांद्रे पश्चिमेत तिचे एक घर भाड्याने दिले आहे. या फ्लॅटसाठी तिला दर महिना ५.५१ लाख रूपये भाडे मिळणार आहे. प्रॉपर्टी कंसल्टेंसी फर्म स्क्वायर यार्ड्सने रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट पडताळणी केल्यानंतर ही माहिती दिली आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये ही नोंदणी करण्यात आली आहे.
स्क्वायर यार्ड्सच्या मते, करिश्मा कपूरचा फ्लॅट हिल रोडवरील ग्रँड बे कॉन्डोमिनियममध्ये आहे. त्याचा कार्पेट एरिया २०४.३८ चौरस मीटर आहे, जो अंदाजे २,२०० चौरस फूट आहे. या भाडे करारात तीन कार पार्किंग स्पेसचा देखील समावेश आहे.
सिक्युरिटी डिपॉझिट किती?
या करारासाठी १७,१०० रूपये स्टॅम्प ड्युटी आणि १,००० रूपये नोंदणी शुल्क भरण्यात आले. त्याशिवाय २० लाख रूपये सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून घेण्यात आले आहे. हा भाडे करार नोव्हेंबर २०२५ पासून एका वर्षासाठी आहे. मासिक भाडे ₹५.५१ लाख इतके निश्चित केले आहे. या एकूण वार्षिक भाड्यातून करिश्माला ६६.१२ लाख रूपये मिळतील. करिश्मा कपूरचा हा फ्लॅट यापूर्वीही भाड्याने देण्यात आला होता. तो करार नोव्हेंबर २०२३ मध्ये नोंदणीकृत झाला होता. त्यावेळी हा करार दोन वर्षांसाठी होता. पहिल्या वर्षाचे भाडे दरमहा ₹५ लाख होते आणि दुसऱ्या वर्षी ते दरमहा ₹५.२५ लाख झाले. त्या दोन वर्षांच्या कराराचे एकूण भाडे ₹१.२३ कोटी झाले होते.
वांद्रे पश्चिम इतकं महाग का?
वांद्रे पश्चिम हा मुंबईतील उच्चभ्रू वस्तीपैकी एक आहे. याठिकाणी प्रमुख रस्ते, लोकल रेल्वे स्थानके आणि येणारे मेट्रो मार्ग सहज पोहोचता येतात. वांद्रे पश्चिम इथं वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी), माहीम आणि सांताक्रूझ सारख्या प्रमुख क्षेत्रांशी जवळीकता असल्याने हे या परिसराचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. येथे चांगली घरे, शॉपिंग मार्केट, उत्कृष्ट रेस्टॉरंट्स, बँडस्टँड आणि कार्टर रोड सारखी समुद्रकिनाऱ्यावरील आकर्षणे आहेत. या परिसरात अनेक कलाकार, व्यावसायिक यांची घरे आहेत.