फोटो देण्यास करिनाने दिला नकार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 02:45 IST2018-06-22T02:45:07+5:302018-06-22T02:45:10+5:30

बेबो अर्थात करिना कपूर तिच्या स्टाईल आणि लूकसाठी ओळखली जाते.

Karina refused to give the photo! | फोटो देण्यास करिनाने दिला नकार!

फोटो देण्यास करिनाने दिला नकार!

मुंबई- बेबो अर्थात करिना कपूर तिच्या स्टाईल आणि लूकसाठी ओळखली जाते. प्रेग्नंसीदरम्यान करिनाचे वजन वाढले होते. पण प्रसूतीनंतर सहाचं महिन्यात करिना पुन्हा एकदा आपल्या ग्लॅमरस लूकमध्ये परतली. जिममध्ये तासन तास मेहनत करत, कडक डाएट फॉलो करत तिने पुन्हा पूर्वीचे लूक मिळवले. आता आम्हाला पुन्हा एकदा करिनाचे ग्लॅमरस लूक आठवण्याचे कारण म्हणजे, तिचा ताजा व्हिडिओ. या व्हिडिओत करिना फोटोग्राफरला पोझ देण्यास नकार देतेय. विशेष म्हणजे या नकाराचे कारण मोठे गोड आहे. काही दिवस लंडनमध्ये सुट्टी एन्जॉय केल्यानंतर करिना अगदी दोन दिवसांसाठी भारतात परतली. यादरम्यान ती तिचा मित्र मनीष मल्होत्राच्या घरी गेली. मनीषच्या घरातून बाहेर पडत असताना फोटाग्राफरनी तिचे फोटो क्लिक करण्याचा प्रयत्न केला. तिला एक ग्रूप फोटो देण्याची विनंती केली गेली. पण करिनाने नकार दिला. का माहितीये, कारण तिने केसात तेल लावले होते. ‘नहीं, मैंने बाल में तेल डाला है...’ असे हसत हसत करिना म्हणाली आणि आपल्या गाडीत गेली. यावरून करिना तिच्या स्टाईल आणि लूकची किती काळजी घेते, याचा अंदाज आपल्याला येईल.

Web Title: Karina refused to give the photo!