कंगनासोबत अफेअरचा रणबीरकडून खुलासा

By Admin | Updated: June 10, 2016 02:36 IST2016-06-10T02:36:45+5:302016-06-10T02:36:45+5:30

कंगना रानोट व रणबीर कपूर यांच्यात काहीतरी शिजत आहे. दोघांमध्ये अफेअर सुरू आहे,

Kareena Kapoor's affair with Ranbir revealed | कंगनासोबत अफेअरचा रणबीरकडून खुलासा

कंगनासोबत अफेअरचा रणबीरकडून खुलासा


कंगना रानोट व रणबीर कपूर यांच्यात काहीतरी शिजत आहे. दोघांमध्ये अफेअर सुरू आहे, अशा बातम्या गेल्या काही दिवसांपासून कानावर पडत आहेत. हृतिक रोशनसोबतच्या वादात रणबीरने कंगनाची बरीच मदत केली होती. त्यामुळे कंगना व रणबीरबद्दलच्या बातम्यांना जरा जास्तच ऊत आला होता. पण रणबीर म्हणे, या बातम्यांमुळे अपसेट आहे. या संपूर्ण प्रकरणावर रणबीरने खुलासा केला आहे. तो सांगतो, एक चांगली मैत्रीण या नात्याने कंगनाला मदत केली. मात्र लोकांनी त्याचा वेगळाच अर्थ काढला. कंगनानेही यावर मौन साधल्याने या नात्यातील सस्पेन्स चांगलाच वाढला. रणबीर ‘जग्गा जासूस’चे शूटिंग संपवून भारतात परतल्यावर त्याच्या कानावर या बातम्या गेल्या. साहजिकच तो या सगळ्या चर्चेमुळे जाम वैतागला. रणबीरच्या एका निकटच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंगना व तो डेट करीत असल्याची बातमी कशी पसरली, हेच रणबीरला कळत नाहीत. यात काहीही तथ्य नसल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. अशा बातम्या पेरणारा कोण, हेही रणबीरला ठाऊक आहे. या अफवा पसरविणे थांबले नाहीच, तर याविरूद्ध ठोस पाऊल उचलण्याचा निर्णय रणबीरने इरादा आहे.

Web Title: Kareena Kapoor's affair with Ranbir revealed