दीपिकाशी लग्न करण्याची कपिलची इच्छा

By Admin | Updated: August 6, 2014 22:51 IST2014-08-06T22:51:03+5:302014-08-06T22:51:03+5:30

कॉमेडी नाईटस् विथ कपिलमुळे प्रेक्षकांची मने जिंकणारा कपिल शर्मा अद्याप अविवाहित आहे.

Kapil's wish to marry Deepika | दीपिकाशी लग्न करण्याची कपिलची इच्छा

दीपिकाशी लग्न करण्याची कपिलची इच्छा

>कॉमेडी नाईटस् विथ कपिलमुळे प्रेक्षकांची मने जिंकणारा कपिल शर्मा अद्याप अविवाहित आहे. त्याच्याकडे लग्नासाठी अनेक मुलींचे प्रपोजल्स येत आहेत; पण कपिलच्या मनात दुसरीच कोणी आहे. नुकतेच केबीसीच्या शूटदरम्यान अमिताभ बच्चन यांनी कपिलला प्रश्न विचारला की, तू केव्हा लग्न करणार आहेस? तेव्हा त्याने बिग बींनाच मदत मागितली. कपिल बिग बींना म्हणाला की, ‘मला दीपिका पदुकोन खूप आवडते. मला तिच्याशी लग्न करायचे आहे. तुम्ही जर बुके पाठवून माङया मनातली गोष्ट तिला सांगितली, तर खूप बरे होईल.’ यावर उत्तर देताना बिग बी म्हणाले की, ‘त्यापेक्षा तूच सुरुवात केलेली योग्य राहील. दीपिका तुङो म्हणणोही ऐकून घेईल.’

Web Title: Kapil's wish to marry Deepika