स्वप्न घेऊन आला अन् शाहरूखच्या बंगल्याबाहेर उभा झाला...! कन्नड दिग्दर्शकाचा असाही खटाटोप

By रूपाली मुधोळकर | Updated: January 1, 2021 16:23 IST2021-01-01T16:21:34+5:302021-01-01T16:23:11+5:30

शाहरूख खानची एक झलक दिसावी म्हणून क्रेजी फॅन्स तासन् तास त्याच्या ‘मन्नत’ बंगल्याबाहेर ताटकळतात. पण एक कन्नड डायरेक्टर असे करतो म्हणजे काय?

kannada filmmaker jayanth seege stand outside shahrukh khan home mannat for hours | स्वप्न घेऊन आला अन् शाहरूखच्या बंगल्याबाहेर उभा झाला...! कन्नड दिग्दर्शकाचा असाही खटाटोप

स्वप्न घेऊन आला अन् शाहरूखच्या बंगल्याबाहेर उभा झाला...! कन्नड दिग्दर्शकाचा असाही खटाटोप

ठळक मुद्देशाहरूखच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच तो ‘पठाण’ या सिनेमात दिसणार आहे. ‘झिरो’ हा शाहरूखचा अखेरचा रिलीज झालेला सिनेमा. तेव्हापासून त्याचा एकही सिनेमा रिलीज झालेला नाही.

शाहरूख खानची एक झलक दिसावी म्हणून क्रेजी फॅन्स तासन् तास त्याच्या ‘मन्नत’ बंगल्याबाहेर ताटकळतात. पण एक कन्नड डायरेक्टर असे करतो म्हणजे काय? होय, 2020 वर्ष मावळत असताना साऊथचा जयंत सीगे एस. हा दिग्दर्शक अनेक तास ‘मन्नत’बाहेर उभा होता. त्याच्या हातात एक पोस्टर होते. येणारे जाणारे सर्व त्याच्याकडे बघून कुत्सिलपणे हसू लागले. पण त्याला पर्वा नव्हती. चिंता फक्त एकच, कसेही करून शाहरूखचे लक्ष त्याच्याकडे जावे. किमान एक डायरेक्टर त्याच्या बंगल्याबाहेर अनेक तासांपासून उभा आहे, ही बातमी त्याच्या कानापर्यंत तरी पोहोचावी.
आता या दिग्दर्शकाने हा सगळा खटाटोप कशासाठी करावा, तर त्याच्या चित्रपटासाठी. होय, जयंती सीगे एस. नावाच्या या दिग्दर्शकाने ‘मन्नत’ बाहेरचा स्वत:चा फोटो पोस्ट करत, खुद्द याबद्दल माहिती दिली.

त्याने लिहिले, ‘हे बेकार वर्ष संपणार असताना मी असा मूर्खासारखा शाहरूखच्या घराबाहेर उभा आहे. कारण एकच माझे स्वप्न.   माझ्या ‘प्रोजेक्ट एक्स’कडे त्याचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतोय. कदाचित शाहरूख घरी नसेलही. पण कृपा करून तुम्ही माझे हे प्रयत्न त्याच्यापर्यंत पोहोचण्यास माझी मदत करा. मी एक स्वप्न पाहिलेय आणि त्यासाठी इथे उभा आहे.’

आता या दिग्दर्शकाला शाहरूखकडून काय मदत अपेक्षित आहे, हे ठाऊक नाही. पण स्वप्नपूर्तीसाठी त्याने चालवलेल्या या खटाटोपाचे सोशल मीडियावर जोरदार कौतुक होतेय. तुझे स्वप्न एसआरके नक्की पूर्ण करेन, शुभेच्छा, अशा कमेंट्स वर्षाव त्याच्या या पोस्टवर होतोय. आता फक्त कधी, ते मात्र एसआरकेच्या या दिग्दर्शकाकडे लक्ष जाईल तेव्हाच.
शाहरूखच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच तो ‘पठाण’ या सिनेमात दिसणार आहे. ‘झिरो’ हा शाहरूखचा अखेरचा रिलीज झालेला सिनेमा. तेव्हापासून त्याचा एकही सिनेमा रिलीज झालेला नाही.

Web Title: kannada filmmaker jayanth seege stand outside shahrukh khan home mannat for hours