करणवर बरसली काजोल!

By Admin | Updated: April 9, 2017 01:10 IST2017-04-09T01:10:03+5:302017-04-09T01:10:03+5:30

कधी काळी करण व काजोल यांच्यात नको इतकी घनिष्ठ मैत्री होती. पण अचानक कुठे माशी शिंकली कोण जाणे; पण करण व काजोलची मैत्री तुटली.

Kajol has been Kajol! | करणवर बरसली काजोल!

करणवर बरसली काजोल!

कधी काळी करण व काजोल यांच्यात नको इतकी घनिष्ठ मैत्री होती. पण अचानक कुठे माशी शिंकली कोण जाणे; पण करण व काजोलची मैत्री तुटली. अलीकडे एका इव्हेंटमध्ये ती रिअ‍ॅक्ट झाली की, करणला तिचा हा टोमणा झोंबणार आहे. ती म्हणाली, मला
सध्या कुठल्याही वादावर बोलायचे नाही. तूर्तास या मुद्यावर शांत राहणेच योग्य आहे. योग्य वेळी याविषयी मी प्रतिक्रिया देईन आणि माझे मत
सर्वांपर्यंत पोहोचेल, याची मी काळजी घेईन. माझ्या मते हल्ली प्रामाणिकपणाचा आव आणून वागण्याचे प्रमाण वाढले आहे. फक्त एका पुस्तकाची विक्री करण्यासाठी, चित्रपटाला चांगले रेटिंग मिळण्यासाठी बरेच लोक इतरांना त्यांच्या प्रामाणिकपणाचे प्रमाणपत्र देतात. कॅमेऱ्यासमोर खोटं बोलण्याला बरीच कारणे असू शकतात. त्यामुळे सध्या प्रामाणिकपणाची काहीच किंमत राहिली नाहीये, असेच म्हणावे लागेल, असे काजोल म्हणाली. आता तिचा इशारा कुणाकडे होता, हे तुम्ही समजू शकताच.

Web Title: Kajol has been Kajol!