बस्स...बहते जाना है!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2016 02:34 IST2016-10-31T02:34:05+5:302016-10-31T02:34:05+5:30

बिग बॉसच्या घरात माझे नाव गेल्या तीन-चार सिझनपासून पुढे येत आहे. परंतु कधी योग आला नाही.

Just ... it's going to flow! | बस्स...बहते जाना है!

बस्स...बहते जाना है!

सतीश डोंगरे
मुंबई- बिग बॉसच्या घरात माझे नाव गेल्या तीन-चार सिझनपासून पुढे येत आहे. परंतु कधी योग आला नाही. या वेळेस घरात जाण्यासाठी सगळ्या गोष्टी जुळून आल्या अन् मी घरात प्रवेश केल्याचे बिग बॉसच्या घरातील कंटेस्टेंट अभिनेता गौरव चौपडा याने बिग बॉसच्या घरात प्रवेश करणाऱ्यापूर्वी लोकमत सीएनएक्सशी साधलेला हा संवाद.
अखेर तू बिग बॉसच्या घरात प्रवेश केला, या वेळेस नेमक्या काय घडामोडी घडल्या?
गेल्या काही सिझनपासून बिग बॉसच्या घरात प्रवेश करणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये माझे नाव हमखास असायचे. परंतु बिझी शेड्यूल किंवा इतर काही खासगी अडचणींमुळे मला घरात प्रवेश करता आला नाही. अखेर या वेळेस सर्व योग जुळून आले. मात्र, या सर्व घडामोडी काही तासांमध्ये घडल्याने मी कुठलाही प्लॅन न करताच घरात प्रवेश केला आहे.

सेलिब्रिटीविरुद्ध इंडियावाले असा सामना या वेळेस रंगणार आहे, काय सांगशील?
बिग बॉसच्या प्रत्येक सिझनमध्ये नवीन संकल्पना राबविली जाते. या वेळेस इंडियावाले बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार असल्याने घरात अनेक घडामोडी घडतील, यात शंका नाही. त्याचबरोबर सेलिब्रिटीची लाइफस्टाइल आणि इंडियावाले यांची लाइफस्टाइल जुळवून घेण्यातही बरीचशी चढाओढ निर्माण होईल. हा खरोखर वेगळा अनुभव असेल.

फॅन्सकडून तुला काय अपेक्षा आहेत?
- खूप अपेक्षा आहेत. घरात त्यांनी मला तारायला हवे. हा शो पूर्णत: प्रेक्षकांच्या भूमिकेवर अवलंबून असल्याने घरातील प्रत्येक सदस्यांचे भवितव्य प्रेक्षकच ठरणार आहेत. दरम्यान, मी माझ्या फॅन्सचे मनोरंजन करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. मी कुठल्याही वातावरणात स्वत: सहज जुळवून घेत असल्याने प्रेक्षक नक्कीच मला स्वीकारतील. घरात सगळ्यांशी जुळवून घेणे, हा माझा प्रयत्न असेल.

Web Title: Just ... it's going to flow!