अखेर ज्युनियर एनटीआरच्या 'NTRNeel'ची रिलीज डेट जाहीर! 'या' खास दिवशी होणार प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 18:17 IST2025-04-30T18:15:47+5:302025-04-30T18:17:43+5:30
अभिनेता ज्युनियर एनटीआरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

अखेर ज्युनियर एनटीआरच्या 'NTRNeel'ची रिलीज डेट जाहीर! 'या' खास दिवशी होणार प्रदर्शित
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता ज्युनियर एनटीआर (Jr NTR) हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. अनेक हिट चित्रपटांमध्ये ज्युनियर एनटीआरनं काम केलं आहे. फक्त साऊथच नव्हे तर जगभरात तो चांगलाच लोकप्रिय आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून 'एनटीआरनील' असे तात्पुरते शीर्षक असलेल्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाबाबत जाणून घ्यायला ज्युनियर एनटीआरचे चाहते आतुर झाले आहेत. अशातच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित करण्यात आली आहे.
पुढल्या वर्षी २५ जून रोजी हा अॅक्शन -ड्रामा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या कथानकाबाबत अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शन 'सालार पार्ट १ - सीजफायर' फेम प्रशांत नील करत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने एनटीआर आणि नील रुपेरी पडद्यावर काहीतरी भव्य दिव्य सादर करण्यासाठी सज्ज झाले आहेत. या चित्रपटात एनटीआरसोबत कोणती अभिनेत्री झळकणार हे देखील सध्या गुलदस्त्यातच आहे.
'एनटीआरनील' या सिनेमाशिवाय अभिनेता 'वॉर-२'मध्ये पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या वॉर या चित्रपटाचा सिक्वेल आहे. वॉर चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केले होते. आता 'वॉर-२'हा चित्रपट पुढील १५ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आहे. तर ज्युनिअर एनटीआर शेवटचा 'देवरा' (Devra) या चित्रपटात दिसला होता. या सिनेमात त्यानं पहिल्यांदाच अभिनेत्री जान्हवी कपूरसोबत स्क्रीन शेअर केली होती. पण, हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप गेला. आता आगामी दोन्ही चित्रपटाकडून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा आहेत.